Crime esakal
नाशिक

Nashik Crime News : ओझरला घरफोडी! अज्ञात चोरट्यांनी चोरले घराचे दरवाजे

Nashik Crime : बाथरुमचा दरवाजा व 3 इलेक्ट्रिक बोर्ड (एकुण किमंत 17 हजार रूपये) काढून घेत चोरून नेले असल्याची घटना ओझर येथे घडली.

सकाळ वृत्तसेवा

ओझर : घर बंद असल्याची संधी साधत आज्ञात चोरट्याने एक हजार लिटरच्या दोन टाक्या दोन दरवाजे , बाथरुमचा दरवाजा व 3 इलेक्ट्रिक बोर्ड (एकुण किमंत 17 हजार रूपये) काढून घेत चोरून नेले असल्याची घटना ओझर येथे घडली. दिनांक 25 एप्रिल रोजी सांयकाळी पांच ते दिनांक 30 च्या दुपारी 12 वाजेच्या दरम्यान कडू शंकर आहिरे यांचे स्वामी समर्थ नगर, पंचवड गणपती मंदिराजवळ ओझर येथील घर बंद होते. (Burglary at Ozar Unknown thieves stole doors of house )

त्या दरम्यान संधी साधत आज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या छतावर असलेल्या एक हजार लिटरच्या दोन टाक्या किमत 10 हजार रुपये, घरातील दोन मुख्य दरवाजे कडी कोयंडासह किमत 5 हजार , बाथरुमचा एक दरवाजा किमत दिड हजार व तिन इलेक्ट्रिक बोर्ड किमत 500 रूपये असे एकूण किमंत 17 हजार रुपये किमतीच्या वस्तू काढून घेऊन चोरी करून पसार झाले.

हि बाब आहिरे यांचे 30 तारखेला निदर्शनास आली त्यानंतर कडू आहिरे यांनी वरील वस्तू चोरी झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात नोंदविल्यावरून ओझर पोलिसांनी आज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचागुन्हा दाखल केला असुन अधिक तपास हवालदार बापू आहेर करत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT