Crime  esakal
नाशिक

Nashik Crime News : चिमुरड्याचा खून करून फेकले झुडपात

Nashik News : नातलग असलेल्या परप्रांतियांमध्ये झालेल्या वादातून एकाने दुसऱ्याच्या दहा वर्षीय मुलाचा निर्घृणपणे खून करून त्याचा मृतदेह झाडाझुडपात फेकून दिला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नातलग असलेल्या परप्रांतियांमध्ये झालेल्या वादातून एकाने दुसऱ्याच्या दहा वर्षीय मुलाचा निर्घृणपणे खून करून त्याचा मृतदेह झाडाझुडपात फेकून दिला. याप्रकरणी सिन्नर एमआयडीसी पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयिताला अटक करण्यात आली आहे. रमेश साह (रा. सिन्नर) असे संशयिताचे नाव आहे. (child was killed and thrown in bush)

तर, अभिषेक अच्छेलाल साह (१०, रा. सिन्नर) असे मृत मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित रमेश साह आणि मयत मुलाचे वडील अच्छेलाल साह हे मूळचे बिहारचे असून एकमेकांचे नातेवाईक आहेत. साह हे एमआयडीसीतील भगवती स्टील कारखान्यात कामाला आहेत. या दोघांमध्ये काही कारणावरून दोन महिन्यांपूर्वी वाद झाला होता. या वादाचा राग संशयित रमेश याच्या मनात होता. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी तो बिहार येथे गेला होता.

बिहारहून परतताच, संशयित रमेश साह याने अच्छेलाल साह यांच्या १० वर्षांच्या अभिषेकचा शुक्रवारी (ता.१०) खून केला. अभिषेकचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेह खंडेराव मंदिराजवळील झाडाझुडपांत फेकून दिला होता.

अभिषेकचा एक हात तोडलेला तर पोटावर चाकूचे वार होते. अभिषेक बेपत्ता झाल्याची तक्रार नातेवाइकांनी एमआयडीसी पोलिसांत केलेली होती. निफाड विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ. नीलेश पालवे, निरीक्षक यशवंत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार भगवान शिंदे, योगेश शिंदे, प्रकाश उंबरकर, प्रशांत सहाणे आदींचे पथक शोध घेत होते.

अभिषेकचा मृतदेह आढळून आल्यानंतर गुन्ह्याची उकल करीत पोलिसांनी संशयितास अटक केली. पोलिस निरीक्षक यशवंत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सुरवाडकर यांच्यासह पथक घटनेचा तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चारित्र्य पडताळणी दाखला कसा काढायचा? महा-ई-सेवा केंद्रातून ‘या’ वेबसाईटवर करा अर्ज, १५९ रुपयांच्या शुल्कात ७ दिवसांत मिळेल दाखला, वाचा...

आजचे पंचांग १० ऑगस्ट २०२६! सोमप्रदोषासह जाणून घ्या शुभ-अशुभ वेळा

Falahari Sandwich: उपवासात रोज साबुदाणा नको! झटपट बनवा चटपटीत फलाहारी सँडविच; चवीसोबत पोटही राहील भरलेलं

आजचे राशिभविष्य - १० ऑगस्ट २०२६

ढिंग टांग : आखरी रस्ता : एक पाहणी..!

SCROLL FOR NEXT