Lakhs worth of illegal liquor seized after being chased by a team of the State Excise Department. Collective Action Team. esakal
नाशिक

Nashik Crime News : सिनेस्टाईल पाठलाग करून पकडला अवैध मद्यसाठा

Nashik Crime : राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत नाशिक भरारी पथक-१ यांच्याकडून दमनमधील विदेशी मद्यसाठ्याची महाराष्ट्रात अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाला सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत नाशिक भरारी पथक-१ यांच्याकडून दमनमधील विदेशी मद्यसाठ्याची महाराष्ट्रात अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाला सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले. यात लाखोंचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला. धोंडेगाव चौफुली (ता. जि. नाशिक) येथे ही कारवाई करण्यात आली. (Nashik Crime marathi news)

पथकाला कार (क्र-एम.एच-०३ सीबी-९८६९) ने परराज्यातील मद्याची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, क्र-१ नाशिक या पथकाने सापळा रचला होता. कारला थांबण्याचा इशारा केला असता संशयिताने वाहन थांबविले, मात्र चौकशी करीत असताना अचानक वाहन जोरात पळविले.

यामुळे पथकाने पाठलाग सुरू केल्याने चाचडगाव टोल नाका येथील बॅरेकेटस उडवून वाहन नाशिक शहराच्या दिशेने पळविले. वाहन उमराळे फाट्यावरुन दिंडोरीमार्गे गेले. पथकाने पाठलाग करून वाहनास दिंडोरी रस्त्यावरील रणतळे या ठिकाणी वाहन थांबवून पळून जाताना संशयित वाहनचालक ललित रामूभाई सुमड (रा. वापी) यास ताब्यात घेतले.

वाहनातील विदेशी मद्याच्या पंधराशे बारा बाटल्या जप्त केल्या. जप्त मद्यासह कार व मुद्देमालाची अंदाजे किंमत २० लाख रुपये आहे. राज्य शुल्कच्या विभागीय उपआयुक्त उषा वर्मा, अधीक्षक शशिकांत गर्जे, उपअधीक्षक ए. एस. तांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे निरीक्षक विलास बामणे, आर. सी. केरीपाळे, गणेश नागरगोजे व सुनील दिघोळे, विजेंद्र चव्हाण, राहुल पवार, कैलास कसबे यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT