Tree Cutting Crime esakal
नाशिक

Nashik Crime News : रवी महाजन बिल्डर ॲन्ड डेव्हलपर्सकडून विनापरवानगी देशी वृक्षांची तोड; गुन्हा दाखल

Crime News : शहरातील काठे गल्ली त्रिकोणी गार्डन परिसरात विकासाच्या नावाखाली अनधिकृतरीत्या वृक्षतोड करण्यात आली होती.

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : पर्यावरणाचा बिघडलेला समतोल राखण्यासाठी एकीकडे वृक्षलागवडीसह वृक्षसंवर्धनाची मोहीम हाती घेतली जात असताना दुसरीकडे विकासाच्या नावाखाली प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक रवी महाजन बिल्डर अॅन्ड डेव्हलपर्स यांच्याकडूनच वृक्षांची कत्तल करण्यात आली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Nashik Crime Cutting trees without permission Ravi Mahajan Builder Developers news)

शहरातील काठे गल्ली त्रिकोणी गार्डन परिसरात विकासाच्या नावाखाली अनधिकृतरीत्या वृक्षतोड करण्यात आली होती. यानंतर पर्यावरणप्रेमींकडून याबाबत महापालिका उद्यान विभागाला तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने उद्यान निरीक्षक सचिन देवरे यांनी १८ डिसेंबर २०२३ ला घटनास्थळी भेट देत परिसरातील पाहणी केली असता त्यांना देशी प्रजातीचे आवळा, चाफा आणि पिंपळ असे प्रत्येकी एक वृक्ष पूर्णपणे तोडले असल्याचे दिसून आले.  (latest marathi news)

उद्यान निरीक्षक देवरे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करीत अवैधरीत्या वृक्षतोड केल्याप्रकरणी शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक रवी महाजन बिल्डर अॅन्ड डेव्हलपर्स यांना २ जानेवारी २०२४ ला नोटीस बजावत खुलासा मागितला.

मात्र, वृक्षतोड केल्याप्रकरणी रवी महाजन बिल्डर अॅन्ड डेव्हलपर्स यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही. या प्रकरणी अखेर देवरे यांच्या तक्रारीवरून त्यांच्याविरुद्ध भद्रकाली पोलिस ठाण्यात वृक्षतोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka CM: कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? तारीख आली समोर, डीके शिवकुमार २५वे मुख्यमंत्री होणार

Pune Civic Funds: पुणे महापालिकेला समाविष्ट ३२ गावांचा जीएसटी परतावा थकित; १८८६ कोटींअभावी पायाभूत विकास अडखळला

Latest Marathi Update Live: विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका आणि इतर मुद्द्यांवरून भोपाळमध्ये आंदोलन

तो ३०- ४० जण घेऊन माझ्या घराजवळ... पुसदमध्ये 'चला हवा येऊ द्या' फेम अंकुर वाढवेवर टोळक्याकडून हल्ला; नेमकं काय घडलं?

Karnataka CM : DK शिवकुमार यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड; कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होणार; नव्या मंत्रिमंडळात कोणाला लागणार लॉटरी?

SCROLL FOR NEXT