Ex- Corporator Adv. Sunil Borade was attacked by three youths esakal
नाशिक

Nashik Crime News : माजी नगरसेवक ॲड. सुनील बोराडे यांच्यावर विहीतगाव येथे जहल्ला! तिघा संशयितांना अटक

Nashik News : जेलरोड येथील माजी नगरसेवक ॲड. सुनील बोराडे यांच्यावर विहीतगाव-वडनेर रोड येथे तिघा युवकांनी हल्ला केला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सिन्नर फाटा भागात माजी नगरसेविकेच्या पतीवर रस्त्यात केक कापणाऱ्या टवाळखोरांनी जीवघेणा हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच जेलरोड येथील माजी नगरसेवक ॲड. सुनील बोराडे यांच्यावर विहीतगाव-वडनेर रोड येथे तिघा युवकांनी हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिसांनी काही तासातच तिघा संशयितांना अटक केली. (Ex- Corporator Adv. Sunil Borade was attacked by three youths)

टवाळखोरांकडून हल्ल्याच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.रविवारी (ता.२) रात्री नऊला माजी नगरसेवक सुनील बोराडे आणि त्यांचे मित्र सुरेश परदेशी विहीतगाव वडनेर रोडवरील एका मंगल कार्यालयात परिचिताच्या मुलाच्या विवाहाच्या स्वागत समारंभाला गेले होते. कार्यक्रमाला उपस्थित राहून हे दोघे कारने आगरटाकळी येथील कार्यक्रमास जाण्यास निघाले.

विहितगाव महापालिका शाळेपर्यंत आल्यावर बोराडे यांचे मित्र सुरेश परदेशी यांना या मार्गे लांब पडेल म्हणून जय भवानी रोडमार्गे जाण्याचे ठरवले. यावेळी चारचाकी वळवत असताना तोंडाला रुमाल बांधलेल्या तीन युवकांनी बोराडे यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न केला. आपल्या कारचा धक्का त्यांना लागला असावा म्हणून ते कार थांबविण्याचा प्रयत्न करत असतील अशी शंका श्री. बोराडे यांना आली.

त्यांनी व मित्राने कार थांबवली. गाडी थांबताच संशयितांनी बोराडे व परदेशी यांच्यावर हल्ला चढवत मारहाण करण्यास सुरवात केली. विनाकारण हे हल्लेखोर शिवीगाळ करून मारहाण करू लागल्याने बोराडे यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. आपल्या विरुद्ध खूप लिहितो, बोलतो, घ्या यांना देवळाली कॅम्पच्या दिशेने, असे हल्लेखोर बोलू लागले. यावेळी येणारे जाणारे नागरिक, चालक थांबले. (latest marathi news)

श्री. बोराडे यांनी गाडीचा दरवाजा उघडून बाहेर येण्याचा प्रयत्न करताच हल्लेखोर फरार झाले. त्यातील एका युवकाने काढलेली गाडीची चावी जवळच फेकून दिली. हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेत सुनील बोराड यांनी त्वरित उपनगर पोलिस ठाणे गाठले. हल्लेखोरांविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यावरून अदखल पात्र गुन्हा दाखल झाला आहे.

उपनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. त्या आधारे तसेच मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित ओंकार संतोष साखला आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली. जुन्या वादातून त्यांनी हे कृत्य केल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT