नाशिक

Nashik Fraud Crime : स्‍वस्‍तात फ्लॅट खरेदीचे आमिष पडले महागात! दोघांनी मिळून घातला 9 लाखांचा गंडा

Fraud Crime : बँकेने जप्त केलेली प्रॉपर्टी, घर लिलावातून कमी किमतीमध्ये मिळवून देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्‍याचा प्रकार समोर आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fraud Crime : बँकेने जप्त केलेली प्रॉपर्टी, घर लिलावातून कमी किमतीमध्ये मिळवून देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्‍याचा प्रकार समोर आला आहे. सप्‍टेंबर २०२३ पासून आजवर भामट्यांनी संबंधिताला तब्‍बल नऊ लाख रुपयांना गंडविले आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्‍हा दाखल झाला आहे. (nashik crime financial fraud has come to fore by showing lure of getting flat)

अशोक अप्पाजी लहामगे (वय ५८, श्रमिकनगर) यांनी सातपुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संशयित राहुल वासुदेव भडांगे (वय ३२, रा.तांबे मळा, शांतिनगर, पंचवटी) आणि सोमनाथ विठ्ठल धात्रक (वय ३६, रा. हमालवाडी, पेठरोड, पंचवटी) असे आर्थिक फसवणूक केलेल्‍या दोघा संशयितांची नावे आहेत.

फिर्यादीत म्‍हटले आहे, की गेल्‍या वर्षी सप्‍टेंबर महिन्‍यात भामट्यांनी श्री. लहामगे यांच्‍याशी संपर्क साधत बँक ऑफ महाराष्ट्र यांनी जप्त केलेली प्रॉपर्टी, घर लिलावात कमीत कमी किमतीत मिळवून देण्याचे आमिष दाखविले. व त्‍याच्‍या मोबदल्‍यात दलाली पोटी वेळोवेळी पैशांची मागणी केली. त्‍यानुसार फिर्यादीदार लहामगे यांनी तब्‍बल नऊ लाख रुपयांची रक्‍कम या भामट्यांनी दिली. मात्र त्‍यांच्‍याकडून कुठल्‍याही स्वरूपाची मालमत्ता उपलब्‍ध करून न दिल्‍याने, आपली फसवणूक झाल्‍याचे त्‍यांच्‍या निदर्शनात आले. व त्‍यांनी पोलिस ठाण्यात धाव घेताना गुन्‍हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL 1st Test: शुभमन गिलला चेंडू लागला, उपचार घेण्यासाठी धावला! भारताच्या सराव सत्रात आज बरंच काही घडलं, वाचा...

पुरस्कार सोहळ्यात नाना पाटेकरांनी माधुरीची घेतली फिरकी, म्हणालेले... 'तुला खुप मिळाले पण...'

Shiv Sena Symbol Case :'शिवसेने'वर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, एकनाथ शिंदे दरे गावी | Eknath Shinde

Marathi News Live Updates : अपात्रतेच्या कारवाईचा निकाल लागल्यानंतर आणि नवीन विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर, चिन्हांचा मुद्दा कदाचित दुय्यम ठरू शकेल - CJI

Retired Cricketer Pension : सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग की सौरव गांगुली, कोणाला मिळते सर्वाधिक निवृत्तीवेतन?

SCROLL FOR NEXT