pistol
pistol  esakal
नाशिक

Nashik Crime News : चाडेगावात एकावर ‘फायर’! युवक जखमी; गोळीबार करणारा सराईत गुन्हेगार पसार

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : चाडेगावची ग्रामदैवत काशाई देवीच्या यात्रोत्सवानिमित्ताने वर्गणीसाठी बैठक झाली. बैठकीनंतर चाडेगाव फाट्यावरील हॉटेलबाहेर एकाने गेल्यावर्षीच्या वर्गणीची शिल्लक रकमेची मागणी केली असता, ती न दिल्याने सराईत गुन्हेगाराने त्याच्याकडील पिस्तुलातून गोळी झाडली. यात गंभीर जखमी युवकाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, संशयित पसार झाला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Crime Fire on one in Chadegaon news)

सचिन मानकर, नाना हुळहुळे, महेंद्र मानकर, गोकुळ मानकर, सूरज वाघ, आकाश पवार, अमोल नागरे, सतिश सांगळे, नंदू नागरे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. तर, गोळीबारात ज्ञानेश्वर प्रकाश मानकर (२८, रा. मानकर मळा, चाडेगाव, ता. नाशिक) हा युवक जखमी आहे. सदरचा प्रकार बुधवारी (ता. २४) रात्री साडेअकराच्या सुमारास चाडेगाव फाटा येथे झाला असून, मुख्य संशयित सराईत गुन्हेगार असून तो व जखमी चुलत भाऊ आहेत.

ज्ञानेश्वर मानकर यांच्या फिर्यादीनुसार, ग्रामदैवत काशाई देवी यात्रेनिमित्ताने संशयित सचिन मानकर याने गावातील मारुती मंदिरात बैठक बोलाविली असता, बहुतांशी ग्रामस्थांची अनुपस्थितीमुळे पुन्हा दुसऱ्या दिवशी बैठक घेण्याचे ठरले. त्यानंतर संशयित सचिन मानकर याने ज्ञानेश्वरला बळजबरीने त्याच्या फॉर्चूनर कारमधून संशयितांसह चाडेगाव फाट्यावरील हॉटेलमध्ये नेले.

तेथे जेवणं झाल्यानंतर संशयिताने ज्ञानेश्वरकडे गेल्या यात्रोत्सवातील शिल्लक वर्गणीतील २० हजारांची मागणी केली. ज्ञानेश्वरने नकार दिल्याने संशयित सचिन याने त्यास मारहाण केली आणि त्याच्या कमरेचे पिस्तुल काढून जीवे मारण्याची धमकी दिली. ते पाहून ज्ञानेश्वर पळू लागला असता, अन्य संशयितांनी त्यास पकडले.

तर, संशयित सचिन याने त्याच्याकडील पिस्तुलीतून झाडलेल्या दोन गोळ्या चुकविल्या तर तिसरी गोळी ज्ञानेश्वरच्या पाठीत घुसली. तशा अवस्थेत तो पळत जाऊन गोकूळ नागरे याच्या घरी गेला आणि आपबिती सांगितली. त्यास रुग्णालयात नेण्यासाठी दोघे निघाले असता, संशयित नागरेच्या घरासमोर पोहोचले. संशयितांनी त्यास बळजबरीने स्वत:च्या गाडीत बसविले आणि गंगापूर रोडवरील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर संशयित पसार झाले. (latest marathi news)

घटनेची माहिती मिळताच उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त डॉ. सचिन बारी, नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके व पथक घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलीस संशयितांचा शोध घेत आहे. तपास सहायक निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी हे करीत आहेत.

गोळी नाही तर गज घुसला....

जखमी ज्ञानेश्वर मानकर यास उपचारासाठी रुग्णालयात नेताना संशयित सचिन मानकर याने, जिल्हा रुग्णालयात जायचे नाही. मी सांगेल त्याच हॉस्पिटलला जायचे. गोळी लागल्याचे सांगायचे नाही तर गज घुसल्याचे सांग नाहीतर... असे धमकावले होते.

त्यामुळे ज्ञानेश्वरला गंगापूर रोडवरील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. यापूर्वीही सिडकोतील गोळीबारच्या घटनेत गंभीररित्या जखमी सराईत गुन्हेगारालाही याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यामुळे गुन्हेगारी घटनांतील जखमी अन्‌ या रुग्णालयाचे नेमका संबंध काय, अशी चर्चा आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT