Police officers, personnel including suspects caught with motorcycles stolen cars. esakal
नाशिक

Nashik Bike Theft : दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! मनमाड पोलिसांची कामगिरी: २३ दुचाक्या हस्तगत

Nashik News : चोरीची गाडी विक्रीसाठी आणत असताना पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले.

सकाळ वृत्तसेवा

मनमाड : चोरीची गाडी विक्रीसाठी आणत असताना पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेत त्याच्याकडे विचारपूस केली असता पोलिसांनी चौघांना अटक करत त्याच्या ताब्यातून १० लाख ६० हजार रुपयांच्या वेगवेगळ्या ठिकाणावरून २३ गाड्या हस्तगत करण्यात केल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक घुगे यांनी दिली. (gang of bike thieves arrest)

दुचाकी चोरी करणारा संशयित आकाश सुभाष राऊत (रा. विवेकानंदनगर, मनमाड) हा भाबडवस्ती, डोणगावरोड येथे चोरीची मोटारसायकल विक्री करण्यासाठी येत आहे अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी या भागात सापळा रचत संशयित आकाश राऊत यास ताब्यात घेत त्याच्याकडून एक दुचाकी चप्त केली.

संशयित आकाशकडे मनमाड शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात गाड्या चोरीस गेल्या होत्या. त्या अनुषंगाने चौकशी केली असता या चोरीच्या प्रकरणात अजून इतर तीन जण असल्याचे उघडकीस झाले. त्यानुसार पोलिसांनी सद्‌गुरू शामगिरी गोसावी (डोणगाव रोड, मनमाड), समाधान काळे, (रा. बेजगाव, मनमाड ) आकाश निकम (रा. नांदगाव) या तिघांना अटक केली.

पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस स्थानकात आणले असता त्यांचीही कसून चौकशी करण्यात आली. या मोटारसायकल चोरीच्या प्रकरणात हे चौघे जण संगनमताने गाड्या चोरी करण्याचा आणि विकण्याचा प्लॅन करत होते. तिघांनी गाड्या चोरी करायच्या आणि एकाने या चोरीच्या गाड्यांना ग्राहक शोधायचा. (latest marathi news)

ग्राहक शोधणारा आरोपी महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, मालेगाव अपर पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक घुगे, श्री. वाघ, पंकज देवकाते, श्री सरोवर, गणेश नरोटे, संदीप झाल्टे, रणजित चव्हाण, गौरव गांगुर्डे, भूषण झाल्टे, राजेंद्र खैरनार, समाधान देशमुख यांनी ही कारवाई केली.

कमी किमतीत दुचाकी

सदर चोरलेल्या गाड्या संशयित अगदी कमी किमतीत विक्री करायचे. संशयित यांनी मनमाड व परिसर, नांदगाव, चांदवड, निफाड आदी ठिकाणाहून गाड्या चोरायचे. पोलिसांनी संशयित यांच्याकडून १० लाख ६० हजार रुपयांच्या एकूण २३ गाड्या ताब्यात घेतल्या आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Voter Fraud: बापरे! एकाच घरात ४ हजार २७१ मतदार; अधिकाऱ्यांनी केले हात वर, म्हणाले...

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस...सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा

Gold Investment : 'पितृपक्षात सोने खरेदी करू नये' हा गैरसमज मोडीत; सराफ व्यावसायिकांचे निरीक्षण

US tariff on India update: अमेरिका लवकरच मोठा निर्णय घेणार! भारतावरील अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ हटवणार?

Neeraj Chopra कडून घोर निराशा! जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक राखण्यात अपयशी, टॉप-६ मध्येही स्थान नाही

SCROLL FOR NEXT