11 kg ganja seized from a house in Ambad area. along with a team of Unit One of the City Crime Branch.
11 kg ganja seized from a house in Ambad area. along with a team of Unit One of the City Crime Branch. esakal
नाशिक

Nashik Crime News : अंबडमध्ये घरात सापडला गांजाचा साठा; संशयिताला अटक

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरात वारंवार अंमली पदार्थ सापडतो आहे. अंबड परिसरातील एका घरामध्ये साठा करण्यात आलेला सुमारे ११ किलो गांजा पोलिसांच्या हाती लागला आहे. शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने सापळा रचून गांजाचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करून एकाला अटक करण्यात आली आहे. यश उर्फ बाज्या राजेंद्र पाटील (२५, रा. फ्लोरा फाऊंटन, अंबड-लिंक रोड, अंबड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. (Nashik Crime Ganja stock found in house in Ambad marathi News )

शहर गुन्हेशाखेच्या पथकाकडून आयुक्तालय हद्दीमध्ये सातत्याने गस्त घालत अंमलीपदार्थांविरोधी कारवाई केली जात आहे. गुन्हेशाखेच्या युनिट एकचे अंमलदार विशाल काठे यांना अंबड परिसरामध्ये चोरीछुप्या रितीने गांजा विक्री सुरू असल्याची खबर मिळाली होती. युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना माहिती दिल्यानंतर, सोमवारी (ता. ८) रात्री अंबड परिसरातील अंबड लिंकरोडवर सापळा रचण्यात आला.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार युनिट एकच्या पथकाने फ्लोरा टाऊनमधील पदमश्री रो हाऊसमधील १२ क्रमांकांच्या रोहाऊसवर छापा टाकला. अचानक झालेल्या कारवाईत पोलिसांनी घरझडती घेतली असता, त्यावेळी घरामध्ये ११ किलो ६५० ग्रॅम वजनाचा गांजा पथकाच्या हाती लागला. संशयित बाज्या याने गांजा साठा करून ग्राहकांना चोरीछुप्या विक्री करीत असल्याची कबुली दिली.

मोबाईल व गांजा असा १ लाख ४९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे पोलीस निरीक्षक मधुकर कड, उपनिरीक्षक श्रीवंत, रवींद्र बागुल, विशाल काठे, प्रवीण वाघमारे, संदीप भांड, नाझीम खान पठाण, प्रशांत मरकड, विशाल देवरे, अप्पा पानवळ, समाधान पवार यांनी बजावली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM Pushpa Kamal Dahal : नेपाळच्या पंतप्रधानांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ३ वाजेपर्यंत फक्त ३६.०७ टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कुठे?

Randeep Hooda: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

ICMR On Side Effects Of Covaxin: Covaxin च्या दुष्परिणामांबाबतचे आरोप खोटे? समोर आले नवे अपडेट; ICMR ने अहवालावर उपस्थित प्रश्न केले

SCROLL FOR NEXT