thief esakal
नाशिक

Nashik Fraud Crime : ग्राहकांचे दागिने घेऊन सोनार पसार; अमृतधाम परिसरातील प्रकार

Nashik Crime : परिसरातील ग्राहकांकडून सोन्याचे दागिने नव्याने करून घेण्यासाठी घेतलेल्या सुमारे १८ लाखांच्या दागिन्यांसह पोबारा केल्याचे उघडकीस आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अमृतधाम परिसरात असलेल्या धनश्री ज्वेलर्स या सराफी पेढीचालकाने परिसरातील ग्राहकांकडून सोन्याचे दागिने नव्याने करून घेण्यासाठी घेतलेल्या सुमारे १८ लाखांच्या दागिन्यांसह पोबारा केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसात संशयित सराफी दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Goldsmith snatched customers jewellery )

सोमनाथ हरिबा टोम्पे, ज्योती सोमनाथ टोम्पे (दोघे रा. सोईनगर हौसिंग सोसायटी, सिद्धी अपार्टमेंट, अमृतधाम, पंचवटी) असे दोघा संशयिताची नावे आहेत. हेमंत दगडू देशमुख (रा. सनराईज रो हाऊस, ओंकारेश्वर कॉलनी, साईनगर, अमृतधाम) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित टोम्पे यांचे साईनगरमधील सिद्धी अपार्टमेंटमध्ये धनश्री ज्वेलर्स ॲण्ड दागिने रिपेअरिंग सेंटर या नावाचे दुकान आहे.

संशयित सोने खरेदी-विक्री, जुन्या सोन्याचे नवीन सोने, दागिने करून देण्याचा व्यवसाय करायचे. ऑक्टोबर २०२३ मध्ये देशमुख यांनी त्यांच्याकडील ६ लाख ३५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने संशयित टोम्पेकडे नव्याने घडविण्यासाठी दिले होते. संशयिताने चार-पाच दिवसात देतो म्हणून सांगितले. परत गेले असता, १०-१५ दिवसात देतो म्हणून सांगितले. परंतु २६ नोव्हेंबर २०२३ रोजी ते पुन्हा दुकानात गेले असता ते बंदच होते.

त्यानंतर ते दुकान बंदच आढळून आल्याने त्यांनी चौकशी केली असता, संशयित टोम्पे याने परिसरातील अनेकांकडून अशारितीने दागिने घेतल्याचे समोर आले. परंतु अद्यापपर्यंत संशयित परतलेला नाही. यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने संशयित देशमुख यांच्यासह परिसरातील ग्राहकांनी पंचवटी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार संशयित टोम्पे याने सुमारे १७ लाख ८६ हजार रुपयांचा सोन्याचे दागिने घेऊन पसार झाला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक देवरे हे तपास करीत आहेत. (latest marathi news)

यांची झाली फसवणूक

हेमंत देशमुख - ६ लाख ३५ हजार

संकेत धीरेंद्र बर्वे - १ लाख ३० हजार

अविनाश रामभाऊ पालवे - १ लाख ९० हजार

अनंत सुदाम थोरे - ७० हजार

हरिभाऊ भाऊसाहेब घुगे - २ लाख ५ हजार

किरण दिलीप परदेशी - ६० हजार

रमेश सुदाम देसले - ६० हजार

विद्या महेश नागावकर - १ लाख ३० हजार

मृदुला जितेंद्र शिंदे - २ लाख ५ हजार

एकूण : १७ लाख ८६ हजार रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT