CRIME NEWS esakal
नाशिक

Nashik Crime News : मधुबन लॉजच्या मालकाचा लागेना ठिकाणा

Latest Crime News : खर्डेला या धंद्यात कुणी पार्टनर आहे का? पीडितांना या ठिकाणी कसे आणण्यात आले, आलेल्या पैशांची विभागणी कशी केली जात होती याचा तपास पंचवटी पोलिस करीत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : पंचवटीतील अमृतधामजवळील करवली हॉटेलच्या आडून मधुबन लॉजमध्ये देहविक्रय अड्डा चालविणारा हॉटेल मालक तीन दिवस उलटूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. (Madhuban Lodge owner missing)

करवली हॉटेलमधील मधुबन लॉजचा मालक प्रवीण मधुकर खर्डे (रा. नाशिक) हा छाप्याची कारवाई झाल्यापासून पसार झाला आहे. यावेळी लॉजमध्ये आढळून आलेला व्यवस्थापक मंटुकुमार सीताराम यादव (३२) याला अटक करण्यात आली. दरम्यान, चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून त्यांना महिला वात्सल्यगृहात दाखल करण्यात आले आहे.

अमृतधामजवळील करवली हॉटेलातील मधुबन लॉजवर शहर गुन्हेशाखेच्या मध्यवर्ती गुन्हेशाखेने शनिवारी (ता १२) छापा टाकून अवैधरित्या देहविक्रीचा अड्डा उद्ध्वस्त केला होता. दरम्यान, या लॉजचा मालक खर्डे कारवाई झाल्यापासून पसार आहे. त्याचा मोबाईलही बंद असल्याने त्याचा ठावठिकाणा मिळविण्यात अडचणी येत आहेत. (latest marathi news)

खर्डेचा हॉटेलिंगचा व्वसाय

खर्डे याने काही वर्षांपासून किरकोळ कामधंदा सोडून हॉटेलिंगचा व्यवसाय थाटला. त्यात चांगले पैसे मिळतच असतानाच त्याने लोभापोटी करवली हॉटेलच्या आड मधुबन लॉजमध्ये गुजरात, झारखंड, मालेगाव व पश्चिम बंगालमधील २० ते ४३ वयोगटातील पीडितांकडून देहविक्रय व्यवसाय करवून घेतला. खर्डेला या धंद्यात कुणी पार्टनर आहे का? पीडितांना या ठिकाणी कसे आणण्यात आले, आलेल्या पैशांची विभागणी कशी केली जात होती याचा तपास पंचवटी पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway Traffic Jam : कोकणात जाणाऱ्यांची लगबग; मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लाब रांगा...

आता पोस्टमनही म्युच्युअल फंड विकणार! पोस्ट ऑफिस Mutual Funds चे नवे हब बनणार; ग्रामीण गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी

जन्माष्टमीला बाळाला कृष्ण केलं, तीन दिवसांनी नदीत उडी; चौथ्या दिवशी पतीने बाळासह तिथंच घेतली जलसमाधी....

Ganesh Chaturthi 2025: भारतभर गाजणारा बाप्पांचा जल्लोष! जाणून घ्या विविध राज्यांतील खास गणेशोत्सवाच्या परंपरा

Latest Marathi News Updates : सिंहगड किल्ल्यावर बेपत्ता झालेला तरुण अखेर सापडला

SCROLL FOR NEXT