Bribe Crime  esakal
नाशिक

Nashik Bribe Crime : मालेगावी अव्वल कारकुनाला 22 हजार लाच घेताना अटक

Bribe Crime : येथील धान्य वितरण कार्यालयातील अव्वल कारकून रवींद्र दहिते याला सोमवारी (ता.८) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २२ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्याला अटक करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Bribe Crime : येथील धान्य वितरण कार्यालयातील अव्वल कारकून रवींद्र दहिते याला सोमवारी (ता.८) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २२ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्याला अटक करण्यात आली आहे. शहरातील १५ गरजू कुटुंबातील सदस्यांचे एका सामाजिक कार्यकर्त्याने अंत्योदय योजना व पिवळ्या रेशन कार्डचे रेशन मिळण्यासाठी ऑनलाइन नोंदणी केलेली प्रकरणे सादर केली होती. (Nashik Crime Malegaon to clerk arrested for taking 22 thousand bribe marathi news)

धान्य वितरण कार्यालयातील अव्वल कारकून रवींद्र दहिते यांनी या कार्यकर्त्यांकडे ४ एप्रिलला प्रत्येक कुटुंबीयांचे दीड हजार रुपयांप्रमाणे एकूण १५ शिधापत्रिका ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी २२ हजार ५०० रुपयांची मागणी केली होती. याबाबत संबंधित कार्यकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

यानंतर विभागाच्या पथकाने सोमवारी (ता. ८) सापळा रचून २२ हजार ५०० पैकी कार्यकर्त्याला देत उर्वरित २२ हजार रुपये स्वीकारताना अटक केली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kamaltai Gavai : संघाच्या कार्यक्रमाला जाणं टाळलं, पण पत्राद्वारे दिल्या शुभेच्छा; कमलताई गवई यांनी नेमकं काय म्हटलं?

FASTag नसल्यास १०० रुपयांऐवजी UPIने १२५ तर रोख २०० रुपये; टोलबाबत नवे नियम

Latest Marathi News Live Update : दोन दिवस पोलिसांची निलेश घायवळाच्या पुण्यातील घरांवर छापेमारी; बंदुकीच्या गोळ्या, जमिनींची कागदपत्रे सापडली

माेठी बातमी! 'पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण भोवणार'; नेमके काेणत्या शेतकऱ्यांचे सरकारी लाभ बंद होण्याची शक्यता..

Vidarbha Tigers: सह्याद्रीत घुमणार विदर्भातील वाघांची डरकाळी! स्थानांतरणास हिरवा कंदील, वन्यजीव-मानव संघर्ष टाळण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT