Deputy Commissioner of Police Monika Raut, Assistant Commissioner Sachin Bari, Senior Inspector Ramdas Shelke and other officials. and suspect.
Deputy Commissioner of Police Monika Raut, Assistant Commissioner Sachin Bari, Senior Inspector Ramdas Shelke and other officials. and suspect. esakal
नाशिक

Nashik Crime News : ‘एमडी’ ड्रग्जचा लाखांचा साठा जप्त

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : मॅफेड्रॉन (एमडी) ड्रग्‍जचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांकडून सातत्‍याने कारवाई केली जात आहे. असे असतानाही एमडी ड्रग्ज विक्रीचे प्रयत्‍न शहरात थांबलेले नाहीत. रविवारी (ता. २४) सायंकाळी साडेसातच्‍या सुमारास पंचक गावाजवळ नाशिक रोड पोलिसांनी विक्रेत्‍याला बेड्या ठोकत त्‍याच्‍याकडून सुमारे एक लाख रुपयांचा ३२ ग्रॅम वजनाचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी आणखी दोघांविरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.(Nashik Crime MD drug worth lakhs seized)

अटक केलेल्याचे नाव सागर शिंदे (वय ३०, रा. पिंपळपट्टी रोड, जेल रोड) असे आहे. यापूर्वी एमडी तयार करणारा कारखाना, तसेच गुदामावर कारवाई करताना नाशिक रोड पोलिसांनी कोट्यवधींचा साठा जप्त केला होता. यानंतरही सातत्‍याने एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाईचा धडाका सुरू आहे.

तरीही शहरात एमडी ड्रग्‍जची विक्री सुरू असल्‍याने यंत्रणादेखील चक्रावली आहे. गस्‍तीवर असताना नाशिक रोड पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला पिंपळपट्टी रोड परिसरात संशयित एमडी विक्रीच्या प्रयत्नात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. (latest marathi news)

सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांना ही माहिती दिली. यानंतर पथकाने परिसरात सापळा रचत संशयित सागरला ताब्‍यात घेतले. पोलिसीखाक्‍या दाखविताच त्याने जाफर पटेल (रा. कथडा, जुने नाशिक) व सैफुला भाई (रा. अशोका रोड) या संशयितांकडून एमडी घेतल्याची कबुली दिली.

त्यानंतर संशयित सागरसह जाफर व सैफुला अशा तिघांविरोधात नाशिक रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील इतर दोघे संशयित जाफर व सैफुला यांचा पोलिस शोध घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT