crime news esakal
नाशिक

Nashik Crime News : सिन्नरला दुचाकी चोरटे गजाआड

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : येथील वावी वेस भागातून दुचाकी चोरणाऱ्या दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली. साजिद रशीद शेख (४०, रा. कानडी मळा, सिन्नर) व संदीप निवृत्ती पवार (वय ३१ रा. वावी वेस, सिन्नर) अशी संशयितांची नावे आहेत.

वावी वेस भागातील स्वप्नील ओतारी यांनी दुचाकी (एमएच १५ इनयू ८७९४) २० डिसेंबर रोजी राहत्या घरासमोरून चोरीस गेली होती. तपासादरम्यान पोलिसांना स्कूटर चोरत असताना चोरट्यांचे सीसीटीव्ही फूटेज मिळाले होते. त्यावरुन पोलिस नाईक राहुल निरगुडे, सहाय्यक उपनिरीक्षक रामदास धुमाळ, पोलिस नाईक हरिश आव्हाड यांनी कसून तपास केला. त्यात संशयितांची ओळख पटविण्यात त्यांना यश आले.

हेही वाचा: Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

यानंतर एक संशयित साजिद शेख असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. शेख याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे चोरीबाबत चौकशी केली असता त्याने संदीप पवार याच्यासह चोरी केल्याचे सांगितले. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून दुचाकी जप्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Action: डॉमिनोजनंतर तुकाराम मुंढेंचा झेप्टो, इन्स्टामार्टसह फ्रुटीवर प्रहार; ११ तास छापेमारी, १४ परवाने निलंबित

BSNL ग्राहकांना स्वातंत्र्य दिनाची 'डिजिटल भेट', एक रुपयात मोबाइल सेवा; २५ हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म

PM Modi Mental Naxalism Statement : 'नक्षलवादाने तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले'; मानसिक नक्षलवादाला ठेचल्याशिवाय भारत विकसित होणार नाही, पीएम मोदींचा जोरदार हल्ला

Independence Day Live Update : पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण, चंद्रकांत खैरेंचा कानमंत्र; दानवेंची गळाभेट चर्चेत

D.B. Dhamanaskar: ज्येष्ठ कवी द. भा. धामणस्कर यांचे निधन

SCROLL FOR NEXT