Crime-Scene esakal
नाशिक

Nashik Crime News : नातवाने केला आजोबा आजीचा खून; कारण ऐकून थक्क व्हाल...

सकाळ वृत्तसेवा

अभोणा : वेरुळे (ता. कळवण) येथील उंबरदरी शिवारातील नारायण मोहन कोल्हे (वय ९४) व सकुबाई नारायण कोल्हे (वय ८८)यांनी खर्चाला पैसे दिले नाहीत, म्हणून रागाच्याभरात नातू काळू ऊर्फ राजकुमार हरी कोल्हे (रा. वरखेडा ता. कळवण) याने दोघांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून त्यांना जीवे ठार मारले.

झोपेतच दोघांच्या डोक्यावर केले वार

शुक्रवार (ता. ३) रोजी मध्यरात्री संशयिताने दोनच्या सुमारास पैसे देण्यावरून भेदभाव करतात, याचा राग धरून वेरुळे येथील आजोबांच्या राहत्या घराच्या पडवीत असलेल्या कुऱ्हाडीने झोपेतच दोघांच्या डोक्यावर वार करून त्यांना जीवे ठार मारले.

मयत नारायण, सकुबाई यांचा मुलगा अमरचंद कोल्हे (अभोणा ता. कळवण) यांनी येथील पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सहाय्यक निरीक्षक नितीन शिंदे व त्यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी भेट देऊन संशयित आरोपी राजकुमार हरी कोल्हे यास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. श्री. शिंदे व उपनिरीक्षक एकनाथ भोईर पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kunbi Caste Certificate Invalidity Case: कुणबीत जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्यांना आणखी एक धक्का! आता थेट हायकोर्टातच अंतिम सुनावणी होईल

करोडोंची संपत्ती, पण प्रवास रिक्षातून! रजनीकांत यांच्या साधेपणाने जिंकली चाहत्यांची मनं; Video चर्चेत

Toll Hike: मुंबईच्या प्रवेशद्वारांवर आजपासून टोल 'भार', पाचही नाक्यांवर २० टक्के दरवाढ; आता किती द्यावा लागणार टोल?

Latest Marathi News Live Update : अमरावती-बडनेरा शहराचा आज पाणीपुरवठा बंद

Delhi NCR PUC Rule : आजपासून 'पीयुसी' नसलेल्या वाहनांना पेट्रोल-सीएनजी मिळणार नाही; नंबर प्लेटवरून होणार तपासणी

SCROLL FOR NEXT