arrest team esakal
नाशिक

काळ्या बाजारात 'रेमडेसिव्हिर'ची विक्री; एकास रंगेहाथ पकडले

निफाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माणिक देसाई

निफाड (जि. नाशिक) : कोरोना महामारीणे सध्या देशभरात थैमान घातले आहे. दररोज हजारो नवे कोरोना बाधित आढळत आहेत आणि कित्येकांचा कोरोनमुळे मृत्यू होत आहे मात्र या सगळ्या बिकट परिस्थीतीत देखील काहीजण मढ्याच्या टाळूवरील लोणी खाण्याच्या प्रयत्नात असल्याचे समोर येत आहे.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची (Corona Positive Patients) अडवणूक करण्याचे प्रकार सर्रास केले जात आहेत, दरम्यान रेमडेसिव्हिर इंजेक्शनची (remedesivir Injection) काळ्या बाजारात विक्री करताना एका व्यक्तीला निफाड पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. राहुल खंडू सानप (२५, रा. शिवरे, ता. निफाड) असे संशयिताचे नाव आहे.

निफाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

राहुल सानप हा संशयित रेमडेसिव्हिर इंजेक्शन काळया बाजारात विकणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता त्याला शांतीनगर चौफुली परिसरात रेमडेसिव्हिर इंजेक्शन विक्री करताना त्यास रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून १ रेमडेसिव्हिर इंजेक्शनचे वायल व एमएच - १५ - एफडी - ८४२५ या क्रमांकाची ॲक्टिव्हा गाडी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक डॉ. नितीन देवरे यांच्या फिर्यादीवरून निफाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार एस. माळी तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT