Fraud news esakal
नाशिक

Nashik Crime News : KYC अपडेटसाठी घेतलेल्या कागदपत्राद्वारे दुकानदारांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : दुकानदारांना हेरून त्यांना आर्थिक व्यवहारासाठी गुगल-पे मिनी स्पीकर देण्याचा बहाणा करणारा संशयित दुकानदारांकडून केवायसीसाठी कागदपत्रे घ्यायचा. याच कागदपत्रांच्या आधारे संशयिताने स्वत:साठी ऑनलाईन कर्ज घेत तीन दुकानदारांची फसवणूक केली. मलिक अमिन मोहम्मद हसन इफेदी (२१, रा. जोहरा अपार्टमेंट, अशोकनगर, सातूपर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

राजेश राजपाल कुसवाह (रा. हेगडेवार नगर, त्रिमूर्तीचौक, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे हेगडेवार चौकात अंकित प्रोव्हिजन जनरल स्टोअर नावाचे दुकान आहे. गेल्या नोव्हेंबर २०२२ मध्ये बसलेले असताना संशयित मलिक हा त्यांच्याकडे गेला. त्याने कुसवाह यांचा विश्वास संपादन करून दुकानातील ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी गुगल पे मिनी स्पीकर देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून केवायसीसाठी कागदपत्रे घेतली.

तसेच, त्यांचा फोटोही काढला. मात्र, संशयित मलिक याने दुकानदार कुसवाह यांना मिनीस्पीकर न देता उलट त्या कागदपत्रांच्या आधारे त्याने स्वत:साठी होम क्रेडिट फायनान्सच्या माध्यमातून ऑनलाईन ४४ हजार रुपयांचे कर्ज घेतले. याचप्रकारे त्याने सिडकोतील आणखी दोन दुकानदारांनाही मिनीस्पीकर देण्याच्या बहाण्याने केवायसीसाठी घेतलेल्या कागदपत्रांच्या आधारे ऑनलाईन प्रत्येकी १०-१० हजार रुपयांचे कर्ज घेतले.

याप्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दुकानदार कुसवाह यांनी अंबड पोलिसात संशयिताविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित मलिक याने गेल्या नोव्हेंबर ते ९ जानेवारी या दरम्यान अनेकांचा गंडा घातला आहे. संशयित मलिक यास अंबड पोलिसांनी सोमवारी (ता. ९) रात्री साडेअकरा वाजता अटक केली असून, त्यास न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर सरन्यायाधीशांना वेळ मिळाला! विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याची याचिका ऐकण्यास सुप्रीम कोर्ट तयार, पण सुनावणी कधी?

IND vs PAK: वैभव सूर्यवंशीचा पुढचा टार्गेट पाकिस्तान? Asian Games मध्ये कधी होऊ शकतो IND vs PAK सामना, जाणून घ्या

Accident News: भीषण दुर्घटना! टाटा सुमोवर दरड कोसळली, १३ जणांचा जागीच मृत्यू, काही जखमी, मृतांमध्ये चिमुकल्याचाही समावेश

NEET Protest: विद्यार्थी आंदोलनातून CJP च्या उदयानं काँग्रेसला मागे टाकलं? विरोधकांचं गणित कसं बदललं? जाणून घ्या संपूर्ण क्रोनॉलॉजी...

Ashadhi Ekadashi 2026: साबुदाणा भिजवायला विसरलात? न भिजवता बनवा उपवासाचे क्रिस्पी मेदूवडे!

SCROLL FOR NEXT