Suspects who were causing trouble in the area of ​​Gangapur Jakat Naka were arrested from Gangapur village. Gangapur Police Station team with the arrested suspects in another photograph. esakal
नाशिक

Nashik Crime News : गावगुंडांची पोलिसांनी काढली धिंड भररस्त्यावर दिला चोफ

वाहनचालकांवर चाकूने हल्ला करणार्या संशयित टोळक्याच्या गंगापूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून, गंगापूर गावातून या गावगुंडांची धिंड काढली.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गंगापूर गावानजिकच्या जकात नाका येथे मद्याच्या नशेमध्ये वाहनांना अडवून काचा फोडल्या तर काही वाहनचालकांवर चाकूने हल्ला करणार्या संशयित टोळक्याच्या गंगापूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून, गंगापूर गावातून या गावगुंडांची धिंड काढली. यावेळी पोलिसांनी संशयितांना भररस्त्यावर चोफ देत त्यांची मस्ती उतरवली. यामुळे त्रस्त नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे. (village gangsters were taken out by police)

अनिकेत उर्फ अंड्या पप्पू शार्दूल (१९, रा. राजीवनगर, गोवर्धनगाव), प्रतिक विष्णू जाधव (१९, रा. मोतीवाला कॉलेजसमोर, दत्त मंदिर, शिवाजीनगर), विजय दादू खोटरे (१९, रा. भवर टॉवर, शिवाजीनगर), कपिल उर्फ चिंटू बाळू गांगुर्डे (२१, रा. मोठा राजवाडा, गंगापूर गाव), रोहित उत्तम वाडगे (१९, रा. मोठा राजवाडा, गंगापूर गाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

संशयितांनी मद्याच्या नशेमध्ये धुंद होत गेल्या मंगळवारी (ता. १३) रात्री अकराच्या सुमारास गंगापूर गाव जकात नाक्याजवळ भररस्त्यावर येणार्या जाणार्या वाहनांना अडवून चालकांशी हुज्जत घातली. यावेळी संशयितांनी जय गजभिये यांच्या हुंडाई कार (एमएच १५ एचक्यु ०७१०), मयुर मोरे यांची टाटा व्हिस्टा कार (एमएच १५ डीएम ८२३२), विजय रसाळ यांचा टेम्पो (एमएच १६ एई ४८५२) यांच्या वाहनांवर दगडफेक करीत काचा फोडून नुकसान केले.

तसेच, गजभिये, कुशल भगत, ओमकार वाळुंज यांनी संशयितांना जाब विचारला असता, टोळक्यातील एकाने त यांच्यावर चाकूने हल्ला करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे भयभीत झालेल्या गजभिये यांनी गंगापूर पोलिसात फिर्याद दिली असता, संशयितांविरोधात प्राणघातक हल्ल्यासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते.

या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाचे उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार संशयितांना कोकणगाव (ता. दिंडोरी) येथून अटक केली.

पोलिसी खाक्या दाखविताच संशयितांची गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर संशयितांची गंगापूर गाव परिसरातून धिंड काढण्यात आली. तसेच, चोफही दिला. सदरची कामगिरी, उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, गिरीश महाले, रवी मोहिते, मच्छिंद्र वाकचौरे, सोनू खाडे, गोरख साळुंके, थविल यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT