Extortion Crime esakal
नाशिक

Nashik Extortion Crime : 20 लाख द्या अन्यथा मुलाला ठार मारीन! बिल्डरला धमकी; संशयितांविरोधात खंडणीचा गुन्हा

Crime News : पंधरा दिवसात खंडणी न दिल्यास मुलाचे अपहरण करून त्यास मारून टाकण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Extortion Crime : बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात जाऊन दोघा बापलेकांनी त्यांच्याकडे २० लाखांच्या खंडणीची मागणी केली. पंधरा दिवसात खंडणी न दिल्यास मुलाचे अपहरण करून त्यास मारून टाकण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाने सरकारवाडा पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संशयित बापलेक पसार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. (Nashik extortion crime kill child Threat to builder news)

सूर्यभान गयाजी जाधव, ओम सूर्यभान जाधव (दोघे रा. ओम हाऊस, पेठगल्ली, गंगापूर गाव) असे खंडणीचा गुन्हा दाखल असलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. बांधकाम व्यावसायिक समीर शामराव केदार (रा. कॅनडा कॉर्नर) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे कॅनडा कॉर्नर परिसरातील वसंत मार्केटमध्ये कार्यालय आहे. संशयित जाधव व केदार यांची पूर्वीची ओळख आहे.

जाधव यांची जमीन केदार यांनी यापूर्वी खरेदी केली असून, त्याचा आर्थिक व्यवहारही पूर्ण झालेला आहे. दरम्यान, २३ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास संशयित जाधव बापलेक हे केदार यांच्या कार्यालयात आले. संशयितांनी केदार यांच्याकडे बेकायदेशीररित्या २० लाख रुपयांची मागणी केली. (Latest Marathi News)

यावर केदार यांनी जाब विचारला असता, संशयितांनी त्यांच्याशी वाद घालत खंडणीची २० लाखांची रक्कम पंधरा दिवसात न दिल्यास तुमच्या मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात दोघा संशयितांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक उपनिरीक्षक उबाळे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

संशयित पसार

संशयित जाधव बापलेकांविरोधात सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल होताच, पोलिसांचे पथक संशयितांना अटक करण्यासाठी गंगापूर गावात गेले असता, संशयित पसार झाले होते. पोलिसांचे पथक संशतियांचा शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT