Crime Against Girl esakal
नाशिक

Nashik Crime News : शाळकरी मुलीने दिला मुलीला जन्म; संशयितांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

Crime News : रोहित गणपत कडाळे (२०, रा. शिवाजीवाडी, वडाळा-पाथर्डी रोड) असे संशयिताचे नाव आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत संशयिताने बलात्कार केला. यामुळे गर्भवती झालेल्या मुलीने नवजात बाळाला जन्म दिला आहे. याप्रकरणी २० वर्षीय संशयितांविरुद्ध पोस्कोन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Crime Crime of rape making pregnant school girl marathi news)

रोहित गणपत कडाळे (२०, रा. शिवाजीवाडी, वडाळा-पाथर्डी रोड) असे संशयिताचे नाव आहे. मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची मुलगी ही रविवार कारंजा परिसरात शाळेत शिक्षण घेते. तर संशयित रोहित याच्याशी २०२३ मध्ये ओळख झाली. त्यानंतर संशयिताने तिच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेत तिला फेब्रुवारी २०२३ मध्ये त्याच्या दुचाकीवरून पांडव लेणी परिसरातील तितली गार्डनमध्ये नेले आणि त्या ठिकाणी तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध केले.

अशाप्रकारे त्याने वारंवार अत्याचार केला. या प्रकारातून मुलगी गर्भवती राहिली आणि तिने नवजात स्त्री जातीच्या बाळाला जन्म दिला आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात पोस्कोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र सदर प्रकार इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने गुन्हा इंदिरानगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.  (latest marathi news)

अल्पवयीन मुलगी गर्भवती

वडनेर दुमाला येथील अल्पवयीन मुलीशी संशयित रोशन संपत बुटे (रा. राजपूत कॉलनी, वडनेर दुमाला) याने तिच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेत शारीरिक संबंध ठेवले. यातून पीडिता गर्भवती राहिल्याने सदर प्रकाराची वाच्यता झाली. याप्रकरणी पालकांच्या फिर्यादीनुसार उपनगर पोलिसात पोस्कोअन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक महाजन तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT