State Bank ATM vandalized by unidentified thieves on Wednesday midnight at Vinchoor esakal
नाशिक

Nashik Crime News : विंचूरला स्टेट बँकेचे एटीएम फोडले; 30 लाख रक्कम गेल्याचा अंदाज 

 Nashik Crime : येथील येवला रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडिया चे एटीएम बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातील ३० लाख रुपयांपेक्षा जास्तची रक्कम स्विफ्ट गाडीतून चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

 विंचूर : येथील येवला रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडिया चे एटीएम बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातील ३० लाख रुपयांपेक्षा जास्तची रक्कम स्विफ्ट गाडीतून चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली. या लुटी नंतर काही तासातच शिरपूर (धुळे) येथे स्टेट बँकेचे एटीएम याच पद्धतीने फोडण्यात आल्याने याच टोळीने तेथे चोरी केल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे. बुधवार ता.०३ रात्री दिड वाजेच्या दरम्यान येथील येवला रोडवरील स्टेट बँकेच्या एटीएम मध्ये स्विफ्ट कार घेऊन आलेल्या दोघांनी आत मध्ये प्रवेश मिळवला. (State Bank ATM vandalized in Vinchur )

सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारून त्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मधील सर्व रक्कम लोटत ते फरार झाले. एटीएम मधील छेडखानी नंतर लासलगाव पोलीस कार्यालयास संगणीकृत मेसेज आल्यानंतर तातडीने लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे व पथक पाच ते दहा मिनिटांमध्ये घटनास्थळी दाखल झाले तोपर्यंत चोरटे फरार झाले होते. या लुटीत अद्याप साधारणपणे तीस लाखांपेक्षा जास्त रक्कम लुटली असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे.

बुधवारी सायंकाळी या एटीएम मध्ये सुमारे ३३ लाख रुपयांची रक्कम भरण्यात आलेली होती. अशी अधिकृत माहिती आहे. या घटनेची माहिती समजताच नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, निफाड चे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन या ठिकाणची पाहणी केली.

दरम्यान घटनेची माहिती कळताच लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी धुळे पर्यंत काही गाड्यांचा पाठलाग केला. तसे ठसा तज्ञांना, श्वानपथकांना पाचारण करण्यात आले होते.  दरम्यान ही घटना घडल्यानंतर धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे असाच एटीएम लुटीचा प्रकार घडला असून तेथे देखील मोठ्या प्रमाणात रक्कम लुटण्यात आलेली असून काही रक्कम एटीएम मध्ये फोडताना जळाल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Gaikwad Imtiaz Jaleel Clash: ‘’तुला तर असं मारेन..असं मारेन की, परत तू...’’ ; संजय गायकवाडांनी आता इम्तियाज जलील यांना भरला दम!

'मला भारताकडून पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे'; अजिंक्य रहाणेची मन की बात! इंग्लंडमधून निवड समितीला पाठवला मॅसेज

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

B.Ed student set herself on fire: खळबळजनक! विभागप्रमुखाच्या लैंगिक छळाने त्रस्त बी.एडच्या विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल; भर कॉलेजमध्येच स्वतःला घेतलं पेटवून

Solapur Fraud: 'सोलापुरातील महिला डॉक्टरची १७ लाखांची ऑनलाइन फसवणूक'; संशयित आरोपी राजस्थान, दिल्लीतील

SCROLL FOR NEXT