Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : अवैध देशीदारूविरोधात धडक कारवाई; एका दिवसात 22 हजारांचा साठा जप्त

Crime News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी अवैध मद्यविक्रीविरोधात आक्रमक भूमिका घेत धडक कारवाईचा बडगा उगारला आहे

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी अवैध मद्यविक्रीविरोधात आक्रमक भूमिका घेत धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांनी बुधवारी (ता. ३) रात्री केलेल्या कारवाईमध्ये सुमारे २२ हजार रुपयांचा अवैध देशीदारुचा साठा जप्त केला आहे. येत्या काळात अवैध धंदे व अवैध मद्यविक्री व साठा करण्याविरोधात पोलिसांकडून तीव्र मोहीम राबविली जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. (Nashik Crime Strike action against illegal gavthi liquor news)

अंबड औद्योगिक वसाहतीतील शांतिनगर झोपडपट्टी परिसरात किराणा दुकानातून अवैधरीत्या देशी दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच चुंचाळे पोलिस चौकीच्या पथकाने छापा टाकत संशयित निवृत्ती तुकाराम शेळके (५७, रा. शांतिनगर) यास अटक करून त्याच्याकडून १ हजार ६८० रुपयांच्या देशीदारुच्या बाटल्या जप्त केल्या.

कालिकानगरमधील सार्वजनिक शौचालयाच्या बाजूला पत्र्याच्या शेडमधून अवैधरीत्या देशीदारु विक्रीचा अड्डा सुरू असल्याची माहिती मिळताच मुंबई नाका पोलिसांनी छापा टाकून संशयित संतोष भगवान आढाव (३९, रा.कालिकानगर) यास अटक करीत त्याच्याकडून १ हजार ७५० रुपयांची देशीदारूच्या बाटल्या जप्त केल्या.

पंचवटीतील वाघाडीच्या बुरुडवाडीमध्ये सुरू असलेल्या देशीदारु अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत संशयित संजय प्रकाश शिरसाठ (३०, रा. संजयनगर, वाघाडी, पंचवटी) यास अटक करून त्याच्याकडून २ हजार १३० रुपयांची देशीदारूच्या बाटल्या जप्त केल्या.  (latest marathi news)

आडगाव हद्दीतील मिरची चौक ते अमृतधाम चौक या रस्त्यालगत पत्र्याच्या शेडमध्ये सापडला. शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने खबर मिळताच छापा टाकत त्याठिकाणाहून १६ हजार २६० रुपयांच्या देशीदारुचा अवैधरीत्या साठा व विक्री करताना जप्त करण्यात आला. संशयित नागेश भानुदास मोरे (३३, रा. पंचवटी) यास अटक करण्यात आली.

"अवैधरीत्या देशीदारुची विक्री व साठा करणाऱ्या विरोधात पोलिसांना धडक कारवाईच्या सूचना केल्या आहेत. अवैधरीत्या मद्यविक्री सुरू असल्यास पोलिसांच्या ९९२३३२३३११ या व्हॉटसॲप क्रमांकावर कळवावे."- प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, शहर गुन्हे शाखा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET UG Result : अन्सर कीमध्ये ६०९, निकाल लागताच ५४० पण दोन तासांनी १६७ गुण; नीट निकालात गोंधळ, विद्यार्थीनीचे गंभीर आरोप

IND vs ENG: लॉर्ड्सवर रोहित-कोहली रचणार इतिहास! सचिन-द्रविडलाही मागे टाकत करणार '400'चा महाविक्रम

Latest Marathi News Live Update : शिक्षण, आरोग्यसेवा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याबाबत सरकार अपयशी - AICC सरचिटणीस सचिन पायलट

Beed News: भ्रष्टाचार उघड होताच रातोरात काम सुरू? बीडमध्ये नेमकं काय घडलं?

सोनम वांगचुक यांची प्रकृती कशी आहे? डॉक्टरांनी दिली अधिकृत माहिती, पत्नीचा रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT