Crime against girl esakal
नाशिक

Nashik Crime: सहलीदरम्यान शिक्षकाने केला विद्यार्थिनींचा विनयभंग; सरकारवाडा पोलिसात ॲट्रोसिटी, पोक्सोअन्वये गुन्हा दाखल

Crime News : याप्रकरणी संशयित शिक्षकाविरोधात पोक्सो, ॲट्रोसिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित संस्थेने संशयित शिक्षकाला तत्काळ निलंबित केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरातील एका शाळेची सहल बाहेरगावी गेली असता, यादरम्यान बसमध्ये पीडित मुलींच्या बाजुला बसून बसच्या खिडकीतून बाहेर थुंकण्याच्या बहाण्याने संशयित शिक्षकाने विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी संशयित शिक्षकाविरोधात पोक्सो, ॲट्रोसिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित संस्थेने संशयित शिक्षकाला तत्काळ निलंबित केले आहे. (Nashik Crime Teacher molested student during field trip marathi news)

भाऊसाहेब किसन सानप (रा. कॅनडा कॉर्नर, नाशिक) असे संशयित शिक्षकाचे नाव आहे. पीडित विद्यार्थिनींच्या फिर्यादीनुसार, कॅनडा कॉर्नर परिसरातील एका शाळेची शैक्षणिक सहल ५ जानेवारी रोजी मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथे गेली होती. या प्रवासादरम्यान, विद्यार्थ्यांसह शिक्षक पर्यटनाचा आनंद घेत गाणी गात होती.

काही विद्यार्थीनी बसच्या खिडकीजवळ बसून निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत होते. सायंकाळच्या जेवणानंतर पुन्हा प्रवास सुरू झाला. या दरम्यान मध्यरात्री दोन ते सहा वाजेच्या दरम्यान, संशयित सानप याने पान खाल्ले होते. ते खिडकीतून बाहेर थुंकण्यासाठी सातवी आणि आठवीच्या विद्यार्थिनींच्या शेजारी जाऊन बसला. (Latest Marathi News)

यावेळी त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न हाईल, असे कृत्य करीत विनयभंग केला. पीडित मुली घरी आल्यानंतर त्यांनी काही दिवसांनी ही बाब कुटुंबास आणि इतर शिक्षकांना सांगितली. त्यानंतर शालेय व्यवस्थापनाने प्रकरणाची चौकशी करत सानप यास निलंबित केले.

यापकरणी सरकारवाडा पोलिसात सानपविरोधात गुन्हा दाखल झाला असून या गंभीर प्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News : कल्ला होणार... CSK संजू, सर्फराज यांच्यासह ५ खेळाडूंना पदार्पणाची संधी देणार, आयपीएल गाजवणार

IDBI बँकेत १३०० पदांसाठी मोठी भरती; पदवीधर उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

वृद्ध, दिव्यांग कर्मचाऱ्यांचा त्रास कमी होणार, कार्यालयांत विशेष सुविधा मिळणार; पालिकेचा महत्त्वाचा निर्णय

MLA Randhir Savarkar: शेतकऱ्यांच्या पीक कर्ज फेडीची मुदत ३० जूनपर्यंत वाढवावी: आमदार रणधीर सावरकर, अन्याय दूर करा!

Sanju Samson 0.32s Video: संजू सॅमसनचा 'हा' Video का झालाय व्हायरल? लोकेश राहुलने हाक मारली, सुरुवातीला तो पुढे निघून गेला अन्...

SCROLL FOR NEXT