Suspect along with Koytya arrested from Bhadrakali area. Along with the team of Unit One of the City Crime Branch. esakal
नाशिक

Nashik Crime News : कोयता बाळगून दहशत माजविण्याऱ्याच्या आवळल्या मुसक्या

Crime News : असलम लतिफ खान (२०, रा. फकिरवाडी, दरबाजरोड, भद्रकाली) असे संशयिताचे नाव आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : भद्रकाली परिसरामध्ये कोयता बाळगून दहशत माजविणाऱ्याच्या शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. (Nashik Crime man arrested carrying knife)

असलम लतिफ खान (२०, रा. फकिरवाडी, दरबाजरोड, भद्रकाली) असे संशयिताचे नाव आहे. शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकचे अंमलदार मुक्तार शेख यांना संशयित असलम खान हा गुमशा बाबा दर्गा परिसरात हातात कोयता बाळगून दहशत माजवत फिरत असल्याची खबर मिळाली होती.

त्यानुसार, पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सुरेश माळोदे, रमेश कोळी, शरद सोनवणे, अप्पा पानवळ, विलास चारोस्कर, अमोल कोष्टी, किरण शिरसाठ यांच्या पथकाने शिताफीने संशयित असलम यास अटक केली. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितास त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Student Drug Prevention: शासनाचा माेठा निर्णय! शालेय समित्‍या होणार ‘नशा’विनाशक; शाळांच्या व्यवस्थापनात मुख्‍य जबाबदारी

Sharad Pawar Devendra Fadnavis सोयाबीन-कापूस करपले, पाणी-चाऱ्याचा प्रश्न गंभीर; शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्या ९ मोठ्या मागण्या

सुरू होऊन ८ महिने नाही झाले तोच निरोप घेणार स्टार प्रवाहची मालिका? मुख्य अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चेला उधाण

Marathi News Live Updates : गणपतीपुळे येथे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी अखेर वस्त्रसंहिता लागू

iPhone 18 Pro खरेदीसाठी देशभरात ग्राहकांच्या रांगा; मुंबई, दिल्ली, बंगळूरूमध्ये मोठी गर्दी

SCROLL FOR NEXT