Damage caused by burglars esakal
नाशिक

Nashik Crime News : कॉलनी भागात चोरांचा सुळसुळाट! मालेगावला घरफोड्यांच्या प्रकारात वाढ

Latest Crime News : शहरातील मुख्य रस्त्यासह काही ठिकाणी मोबाईल स्नॅचिंग, रस्त्यावरून चालणाऱ्यांच्या हातून मोबाईल हिसकावण्याचे प्रकार वाढले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव शहर : शहरातील अनेक कॉलनी, नवीन वसाहती भागात चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. नवरात्रोत्सव व सणांच्या पार्श्वभूमीवर चोरांनी मोर्चा नववसाहती व कॉलनी भागाकडे वळवला आहे. (Thieves on prowl in colony area Increase in burglaries in Malegaon)

परिसरातील विविध कॉलनीतील नागरिक व तरूणांच्या बैठका घेऊन दक्षता घेण्याच्या सूचना देत आहेत. कॉलनी सुरक्षा पथक स्थापन करण्यासह सीसीटीव्ही कॅमेरे बसवून, वॉचमन नेमावेत. दिवसभरात फेरीवाले, फिरस्ते,अनोळखी व्यक्तींपासून सावधान राहावे असे आवाहन पोलिस यंत्रणेने केले आहे.

शहरातील मुख्य रस्त्यासह काही ठिकाणी मोबाईल स्नॅचिंग, रस्त्यावरून चालणाऱ्यांच्या हातून मोबाईल हिसकावण्याचे प्रकार वाढले आहेत. महिला व ज्येष्ठ नागरिक यांना सायंकाळी व रात्री घराबाहेर पडणं मुश्कील झाले आहे. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

नामपूर रोडवर अंधार

मालेगाव कॅम्प येथील पोलिस अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिक व तरुणांच्या समवेत बैठका घेऊन पाठबळ देण्याचा प्रयत्न केला आहे. चर्चगेट ते नामपूर रोड या गजबजलेल्या भागात स्ट्रीट लाईटचा अभाव आहे. कॅम्प भागातील नव्याने मोठ्या प्रमाणावर वसाहती नामपूर रोड, भोसले पेट्रोल पंपाच्या पुढे पर्यंत वाढली आहे. त्याप्रमाणात नागरी सोयी सुविधा नसल्याचा गैरफायदा चोरट्यांनी उचलला आहे. (latest marathi news)

भूखंडावरील गवताचा अडसर

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या परिसरातील आनंद सोसायटी, प्रेरणा सोसायटी, राजमाता जिजाऊ नगराचा भागाच्या मागील बाजूस मोठ्या प्रमाणावर मोकळे भूखंड आहेत. पाच ते सहा फुटांवर गवत वाढले आहे.अनेक बांधकाम चालू असलेल्या बंगल्यांसह, रिकामे शेड चोरट्यांना दडून बसण्यासाठी आयती जागा मिळाल्याने चोरांचे फावले आहे.

जागते रहो...

कॅम्प भागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या परिसरातील आनंद सोसायटी,प्रेरणा सोसायटी, आदर्श कॉलनी,राजमाता जिजाऊ नगर या भागासह परिसरात चोरी करण्याचा प्रयत्न झाला आहे. गेल्या आठ दिवसांपासून या कॉलनी परिसरातील तरुण मंडळी 'जागते रहो' मोहीम राबवत आहे.

राजमाता जिजाऊ नगर भागात एका घराच्या ओट्यावर असलेल्या मोटार सायकल चोरीचा प्रयत्न फसल्यानंतर या चोरट्यांचा शोध या परिसरातील तरूणांनी घेतला. या भागात असलेल्या मोकळ्या भूखंडावरील झाडी झुडपे व वाढलेल्या गवताचा आधार घेऊन ते पसार झाले. या घटनेनंतर पोलिस यंत्रणा खडबडून कामाला लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT