nashik market esakal
नाशिक

कोरोना उतरणीला मात्र इभ्रत टांगणीला! नाशिक मार्केट गर्दीचे फोटो देशभर VIRAL

विक्रांत मते

नाशिक : तीन महिन्यापूर्वी कोरोना संसर्गात (corona virus) देशात चौथ्या स्थानावर असलेल्या नाशिक (nashik) शहरामध्ये आठ दिवसांपासून संसर्ग उतरणीला लागला आहे. ही बाब देशभरात समाधानकारक मानली गेली खरी, परंतु बारा मेपासून लॉकडाउन (lockdown) जाहीर झाल्याने बाजारपेठेत (market crowd) उसळलेल्या गर्दीने प्रशासनाच्या प्रयत्नांवर पाणी फिरले आहे. नाशिकच्या बाजारपेठेतील गर्दीचे फोटो देशभर (photo viral) सोशल मीडियाच्या (social media) माध्यमातून व्हायरल झाल्याने नाशिक बद्दल नकारात्मक चित्र निर्माण झाल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

फेब्रुवारीत एकदम उसळी

गेल्यावर्षी ६ एप्रिल नाशिक शहरामध्ये कोरोना संसर्गाचा पहिला रुग्ण गोविंद नगर भागात आढळला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने संजीवनगर, वडाळागाव, जुने नाशिक, फुलेनगर, सातपूर आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले. ऑक्टोबरपर्यंत कोरोना संसर्गाचा वेग अधिक होता. त्यानंतर मात्र मोठी घसरण झाली. जानेवारीत कोरोना आहे की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु सामाजिक अंतर न पाळल्याने फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपासून नाशिकमध्ये कोरोना संसर्गाने एकदम उसळी घेतली.

नकारात्मक चित्र

मार्च महिन्यात झालेल्या सर्वेक्षणामध्ये देशभरात नाशिक कोरोना संसर्ग वाढण्याच्या वेगात चौथ्या क्रमांकावर होते . यामुळे नाशिकबाबत नकारात्मक चित्र निर्माण झाले. मात्र महापालिका प्रशासनाने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व ट्रीटमेंट या सूत्रांचा वापर करत कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आणला आहे. मार्च-एप्रिल महिन्यात तिप्पट वेगाने पसरणाऱ्या संसर्गाचा वेग मोठ्या प्रमाणात घसरल्याने नाशिकचे कौतुकही सुरू झाले आहे, मात्र सोमवारी (ता. १०) प्रशासनाकडून १२ मे च्या मध्यरात्रीपासून लॉकडाउन जाहीर करण्याची घोषणा करण्यात आली. या घोषणेच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी उसळली. नाशिकमधील गर्दीने राज्यात सर्वत्र लक्ष वेधले. यातून नाशिकबद्दलचे नकारात्मक प्रतिमा निर्माण झाल्याचे सर्वेक्षण सोशल मीडियाच्या माध्यमातून झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

दहा दिवसात रुग्णवाढीचा वेग मंदावला

१ मे रोजी शहरात पंधराशे ५४ रुग्ण आढळले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने रूग्ण संख्येत घट होत गेली. १० मे रोजी ९७३ रुग्ण आढळल्याने हजारच्या खाली साडे तीन महिन्यात प्रथमच रुग्णसंख्या आली. प्रशासनाने रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट बंद केल्याने रुग्णसंख्या घटल्याचा दावा केला जात असला तरी रुग्णसंख्या कमी होणे ही नाशिकसाठी सकारात्मक बाब मानली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Student Drug Prevention: शासनाचा माेठा निर्णय! शालेय समित्‍या होणार ‘नशा’विनाशक; शाळांच्या व्यवस्थापनात मुख्‍य जबाबदारी

Sharad Pawar Devendra Fadnavis सोयाबीन-कापूस करपले, पाणी-चाऱ्याचा प्रश्न गंभीर; शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्या ९ मोठ्या मागण्या

सुरू होऊन ८ महिने नाही झाले तोच निरोप घेणार स्टार प्रवाहची मालिका? मुख्य अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चेला उधाण

Marathi News Live Updates : गणपतीपुळे येथे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी अखेर वस्त्रसंहिता लागू

iPhone 18 Pro खरेदीसाठी देशभरात ग्राहकांच्या रांगा; मुंबई, दिल्ली, बंगळूरूमध्ये मोठी गर्दी

SCROLL FOR NEXT