Newly elected office bearers and members of Divya Nabhik Social Organization present at the meeting.  esakal
नाशिक

Nashik News : एप्रिलपासून कटिंग- दाढी दर 180 रुपये! दिव्य नाभिक सामाजिक संस्थेच्या सभेत निर्णय

Nashik News : दिव्य नाभिक सामाजिक संस्थेची वार्षिक सभा सुनील जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : दिव्य नाभिक सामाजिक संस्थेची वार्षिक सभा सुनील जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सुनील जगताप यांचा कार्यकाल संपल्याने अनिल वैद्य यांची अध्यक्षपदी, तर अरुण वारुळे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. सचिवपदी महेंद्र अहिरराव, खजिनदार सुनील जगताप तर सदस्य म्हणून प्रवीण सोनवणे, .हेमंत हिरे ,कार्तिक चित्ते यांची निवड करण्यात आली. (Nashik Cutting from April 180 rupees per shave marathi news)

मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्यात आले तसेच गतवर्षीच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला आणि आगामी वर्षासाठी नियोजन करण्यात आले. २०१९ पासून कटिंग दाढी यांची दरवाढ करण्यात आलेली नव्हती. एप्रिल २०२४ पासून नवीन दरवाढ करावी, असा सर्व सभासदांनी प्रस्ताव मांडला.

नव्या कार्यकारिणीतील अध्यक्ष अनिल वैद्य यांनी सभासदांनी मांडलेल्या प्रस्तावास सर्वानुमते मंजुरी द्यावी अशी इच्छा व्यक्त केल्यानंतर सर्वानुमते दरवाढीस मंजुरी देण्यात आली. कटिंग दाढीचा दर २०१९ पासून १५० रुपये होता त्यात ३० रुपये वाढ करून एप्रिलपासून १८० रुपये अशी दरवाढ करण्यात आली. (latest marathi news)

दरवाढ पुढील तीन वर्षे लागू असणार आहे. या सभेसाठी परिसरातील सर्व दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी निर्णयाचे स्वागत केले आहे, तरी सर्व नागरिकांनी या दरवाढीचे समर्थन करून सर्व सलून दुकानदारांना योग्य ते सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले.

"सलूनसाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमती त झालेली वाढ तसेच लाइट बिल आणि दुकानासाठी लागणारे भाडे व सर्व दुकानदारांच्या पाल्यांसाठी येणारे शैक्षणिक खर्च आणि सध्याची महागाई लक्षात घेता दरवाढ करण्यात आली आहे."- अनिल वैद्य, अध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Opening: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स 300 अंकांनी वधारला, कोणते शेअर्स चमकले?

Dhantrayodashi 2025: धनत्रयोदशीला मिठाशी संबंधित 'या' गोष्टी करा, आर्थिक अडचणी दूर होतील

Latest Marathi News Live Update : मध्यप्रदेशातील इंदोरमध्ये २५ तृतीयपंथियांनी विष घेतले

Pakistan Semi Final Scenario WC: पाकिस्तानची 'नौका' श्रीलंकेतच बुडणार! उपांत्य फेरी सोडाच, हे तर तालिकेत तळावरच राहणार

Viral Video: मुंबईत राम मंदिर स्टेशनवर ‘थ्री इडियट्स’चा खऱ्या आयुष्यात सीन, व्हिडिओ कॉलवर झाली प्रसूती... 'हा' ठरला रँचो

SCROLL FOR NEXT