Nashik Cyber Crime esakal
नाशिक

Nashik Cyber Crime : शेअर मार्केटच्या नावाखाली 78 लाखांचा गंडा!

Nashik News : शेअर मार्केटच्या नावाने नागरिकांना दीर्घकालीन गुंतवणूक करायला भाग पाडून सायबर चोरट्यांनी ७१ लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शेअर मार्केटच्या नावाने नागरिकांना दीर्घकालीन गुंतवणूक करायला भाग पाडून सायबर चोरट्यांनी ७१ लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तर दुसऱ्या व्यक्तीलाही सात लाखांना लुटल्याची नोंद सायबर पोलिस ठाण्यात झाली आहे. चोरट्याचे व्हॉट्सॲप व इन्स्टाग्राम प्रोफाईलच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. (Cyber ​Crime Extortion of 78 lakhs in name of stock market)

शेअर मार्केटमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो, असे आमिष दाखवून नाशिकमधील विविध व्यक्तींना आतापर्यंत १५ कोटींपेक्षा अधिकचा गंडा सायबर चोरट्यांनी घातला आहे. आताही तशाच स्वरूपाची घटना शहरात घडली. शहरातील दोन व्यक्तींना सायबर भामट्यांनी १५ सप्टेंबर २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत व्हॉटसअप क्रमांक ९५८७११२४४३ व ८०९७४३६८४९ आणि इन्स्टाग्राम प्रोफाईलवरून संपर्क साधला.

आम्ही शेअर मार्केटमधील अधिकृत कंपनीचे ब्रोकर असल्याची बतावणी त्यांनी केली. गुंतवणूक करायचीच आहे आणि आर्थिक फायदाच हवा असेल तर आमच्याकडे ट्रेडिंग, स्टॉक टू आयपीओ घ्या, असे आमिष दाखविले. दरम्यान, स्टॉक डिटेक्शन ग्रुप अशा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये दोघांनाही समाविष्ट होण्यास भाग पाडत अप्पर सर्कीटच्या स्टॉकबद्दल वेळोवेळी माहिती दिली. (latest marathi news)

तर, ‘कर्मा कॅपिटल ट्रेडिंग आणि व्हाइट वे’ अशा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर खाते ओपन करण्यास सांगितले. या अॅपवर विविध कंपन्यांचे स्टॉक तसेच आयपीओ घेण्यासाठी दिलेल्या विविध बँकेच्या खात्यांवर तक्रारदारास ७१ लाख रुपये आणि दुसऱ्या तक्रारदारास सात लाख १५ हजार असे एकूण ७८ लाख ७८ हजार रुपये भरण्यास भाग पाडून आर्थिक फसवणूक केली. वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray visits Meenatai Thackeray statue : उद्धव ठाकरेंनी केली मीनाताईंच्या पुतळ्याची बारकाईने पाहणी अन् म्हणाले ‘’या मागे दोनच व्यक्ती…’’

World Athletics Championships : नीरज चोप्राने एकाच प्रयत्नात केले सर्वांना गार, आता पाकिस्तानच्या अर्शद नदीमच्या कामगिरीकडे लक्ष

Uddhav Nimse : मुंबई हायकोर्टाकडूनही जामीन नाकारला: उद्धव निमसे अखेर पोलिसांपुढे शरण

Navratra and Overthinking Tips: मन गोंधळले असेल तर नवरात्रीचे ९ दिवस देतील नवा आधार! अशी करू शकता ओव्हरथिंकिंगवर मात

Jalaj Sharma : जिल्हाधिकारी जलज शर्मांची मोठी घोषणा: नाशिकमधील गड-किल्ले होणार स्वच्छ

SCROLL FOR NEXT