Deadline for hostel admission till 2nd July esakal
नाशिक

Nashik News : वसतिगृहात प्रवेशासाठी 2 जुलैपर्यंत मुदत

Nashik News : शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत इतर मागास बहुजन कल्याण, सहाय्यक संचालक कार्यालयाच्या अधिनस्त जिल्ह्यातील मागासवर्गीय मुले, मुलींच्या शासकीय वसतीगृहांमध्ये प्रवेश सुरु आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत इतर मागास बहुजन कल्याण, सहाय्यक संचालक कार्यालयाच्या अधिनस्त जिल्ह्यातील मागासवर्गीय मुले, मुलींच्या शासकीय वसतीगृहांमध्ये प्रवेश सुरु आहेत. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून, प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज २ जुलैपर्यंत सादर करावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण नाशिकचे सहाय्यक संचालक सुंदरसिंग वसावे यांनी केले आहे.

वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थांना निवास, दरमहा निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्यासाठी भोजन भत्ता, डीबीटी रक्कम व गणवेश ड्रेसकोड रक्कम आदी इतर अनुषंगिक सोयी-सुविधा शासानामार्फत पुरविण्यात येतील.

वसतिगृह प्रवेशासाठी विहित नमुन्यातील अर्ज सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण नाशिक (सामाजिक न्याय भवन परिसर), नासर्डी पुल, नाशिक- पुणे रोड, नाशिक या कार्यालयात उपलब्ध आहेत. (latest marathi news)

इच्छुक विद्यार्थांनी प्राप्त अर्ज परिपूर्ण भरून २ जुलैपर्यंत संबधित वसतिगृहात सादर करावयाचे आहेत. अधिक माहितीसाठी सहाय्यक संचालक, इतर मागस बहुजन कल्याण नाशिक (सामाजिक न्याय भवन परिसर), नासर्डी पुल, नाशिक- पुणे रोड, नाशिक या कार्यालयात संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trending News : AI ची कमाल ! महिलेला मिळाला २५ वर्षांपूर्वी गेलेला आवाज, नेमका कसा घडला चमत्कार?

Joint Pain: पावसाळ्यात सांधेदुखी का वाढते? जाणून घ्या उपचार कसे करावे

Latest Marathi News Updates : जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी एक क्विंटलचा फुलांचा हार

Online Shopping Discount : कपडे अन् इतर वस्तू सगळ्यात स्वस्त कुठे मिळतात? तुमच्याचं फायद्याचं आहे, पाहा एका क्लिकवर..

Crime News : हुंड्यासाठी पत्नीला मुलासमोर जिवंत जाळलं, पतीचा एन्काउंटर; पोलिसांनी झाडली गोळी

SCROLL FOR NEXT