YCMOU  esakal
नाशिक

Nashik YCMOU Admission : ‘मुक्‍त’च्‍या कृषी अभ्यासक्रम प्रवेश अर्जाची उद्यापर्यंत मुदत!

Nashik News : यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाच्‍या कृषी विज्ञान केंद्रातर्फे चालविल्‍या जाणाऱ्या अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सध्या सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाच्‍या कृषी विज्ञान केंद्रातर्फे चालविल्‍या जाणाऱ्या अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सध्या सुरू आहे. या अंतर्गत प्रमाणपत्र, पदविका अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी बुधवार (ता. १९) पर्यंत मुदत दिलेली आहे. मुक्‍त विद्यापीठातर्फे प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्‍यानुसार संपूर्ण प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली जाते. (Deadline for YCMOU agriculture course admission application till tomorrow)

अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, स्वाक्षरीची फोटोकॉपी, तसेच आरक्षणाचा लाभ घेणार असल्यास त्यासंबंधीचे आरक्षण वर्गातील विविध दाखले/प्रमाणपत्रे (सामाजिक आरक्षण, समांतर आरक्षणाचे प्रमाणपत्रे) आदी अधिकृत मूळ दाखले/प्रमाणपत्रे यांच्या पूर्णतः सुस्पष्टपणे स्कॅन केलेल्या सॉफ्ट फोटोकॉपी बाळगायच्‍या आहेत.

अर्ज भरताना अडचणी उद्‌भवल्‍यास कृषी शिक्षण केंद्राची मदत घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विहित कालावधीतच संपूर्णतः अचूकपणे भरलेला, सत्यता असलेला, तसेच सर्व अपलोड कागदपत्रे सुस्पष्ट दिसतील, असे स्कॅन केलेले प्रवेश अर्जच पुढील प्रवेशप्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जाणार असल्‍याचेही स्‍पष्ट करण्यात आले. यूझर आयडी व पासवर्ड गोपनीय ठेवण्यासह अन्‍य विविध सूचना विद्यापीठाने जारी केल्‍या आहेत. (latest marathi news)

असे आहे प्रवेशाचे वेळापत्रक-

* ऑनलाइन नोंदणी, अर्ज भरण्याची मुदत- १९ जूनपर्यंत

* प्रथम फेरी गुणवत्ता यादीची प्रसिद्धी- २६ जून

* प्रथम गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची मुदत- २६ जून ते २ जुलै

* दुसरी गुणवत्ता यादीची प्रसिद्धी- ८ जुलै

* दुसऱ्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची मुदत- ९ ते १२ जुलै

* शिल्लक जागांची माहितीची प्रसिद्धी- १६ जुलै

* शिल्लक जागांसाठी गुणवत्तेनुसार प्रथम येणाऱ्यास प्रवेश- १८ जुलैपासून

प्रमाणपत्र शिक्षणक्रम- माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र, कृषी अधिष्ठान अभ्यासक्रम. कृषी पदविका शिक्षणक्रम- उद्यानविद्या पदविका, कृषी व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन, कृषी पत्रिकारिता, तसेच फळबागा उत्‍पादन, भाजीपाला उत्‍पादन आणि फुलशेती व प्रांगण उद्यान पदविका असे उद्यानविद्या शाखेतील पदविका अभ्यासक्रम उपलब्‍ध आहेत.

विद्यापीठाची विभागीय

कार्यालयनिहाय केंद्रसंख्या-

विभाग केंद्रसंख्या

नाशिक १६

अमरावती १०

नांदेड ९

पुणे ८

छत्रपती संभाजीनगर ८

कोल्‍हापूर ६

मुंबई

नागपूर ३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jagan Mohan Reddy: मोठी बातमी! जगनमोहन रेड्डींच्या पक्षाने 'NDA'च्या सीपी राधाकृष्णन यांना जाहीर केला पाठिंबा

Uttar Pradesh : योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये केले देशातील दुसऱ्या हरित हायड्रोजन प्रकल्पाचे उद्घाटन

ब्रेकिंग! 18 दिवसांत अतिवृष्टीने राज्यातील ‘या’ जिल्ह्यातील 3.73 लाख हेक्टरवरील पिके भुईसपाट; कृषी विभागाचा नजर अंदाज अहवाल; पंचनामे करण्यास ई-पीक पाहणीची अडचण

MP Nilesh Lanke : श्रीरामपूर-परळी ब्रॉडगेज प्रकल्प पुन्हा सुरू करा; नीलेश लंके यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी

6,6,6,6,6,6! भारतीय गोलंदाजाची T20 मध्ये १९ चेंडूंत फिफ्टी, आठव्या क्रमांकावर आला धुमाकूळ घातला, नंतर ३ विकेट्सही टिपल्या

SCROLL FOR NEXT