Shree Bhagwati Temple has an attractive decoration made of grapes and a reassuring idol of Shree Bhagwati. esakal
नाशिक

Saptashringi Devi : सप्तशृंगी मंदीरात 800 किलो द्राक्षांची सजावट

Saptashringi Devi : आदिमाया सप्तशृंगी मातेच्या मंदिरात ८०० किलो द्राक्ष व १०० किलो झेंडूच्या फुलांपासून आकर्षक तोरण व झुंबर बनवून मंदिराची सजावट करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

Saptashringi Devi : आद्य स्वंयभू शक्तिपीठ सप्तशृंगी गडावर शुक्रवारी (ता.२३) आदिमाया सप्तशृंगी मातेच्या मंदिरात ८०० किलो द्राक्ष व १०० किलो झेंडूच्या फुलांपासून आकर्षक तोरण व झुंबर बनवून मंदिराची सजावट करण्यात आली. आदिमाया सप्तशृंगी मंदिरात देवीचरणी नवसपूर्ती म्हणून शेतातील पीक अर्पण करण्याची प्रथा देवीच्या मंदिरात सुरु झाली असून त्याला भक्तांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ()

शुक्रवारी ओझर येथील बाळासाहेब गडाख यांनी आदिमायेच्या चरणी २० कॅरेट काळी द्राक्ष, २० कॅरेट हिरवी द्राक्ष अशी ८०० किलो द्राक्ष व १० कॅरेट झेंडूची फुले अर्पण केली. त्यानंतर सजावटकार शंकरराव जुन्नरे यांनी पाच ते सहा सहकाऱ्यांच्या मदतीने द्राक्षांचे तोरणांने मंदिराच्या आतील मूर्तीच्या कमान तसेच झेंडूच्या फुलांचे झुंबराची सुंदर अशी सजावट करण्यात आली.

दोन दिवस द्राक्षे आणि फुलांची सजावट ठेवण्यात येणार असून त्यानंतर चांगल्या स्थितीतील द्राक्षे भाविकांना भगवती प्रसाद म्हणून वाटप करण्यात येणार आहे. ट्रस्ट व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, मंदिर पर्यवेक्षक सुनील कासार, प्रशांत निकम आदींसह पुरोहित संघ व कर्मचारीवृंद यांनी सजावटीसाठी सहकार्य लाभले. (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चित्रपट बंद पाडण्याचे खूप प्रयत्न... 'रणपती शिवराय स्वारी आग्रा'बद्दल बोलताना अजय पुरकर संतापले; आव्हान देत म्हणाले- अजूनही...

Delhi-Mumbai Expressway Accident VIDEO : काळ आला होता, पण..! दिल्ली-मुंबई महामार्गावर भरधाव कार ५० मीटरपर्यंत उलटली तरीही सर्वजण सुखरूप

Vijay Hazare Trophy: मुंबईचा रोमांचक विजय, पण महाराष्ट्र-विदर्भ पराभूत; सूर्यकुमार, जैस्वाल अपयशी, तर श्रेयस, रिंकू सिंग चमकले

Congress Leader Attack: अकोल्यात काँग्रेस नेत्यावर हल्ला; भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी दाखल आहे गुन्हा

ECI notice to Mohammed Shami: मोहम्मद शमीला निवडणूक आयोगाची नोटीस!, जाणून घ्या, नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT