Panchavati Express  esakal
नाशिक

Panchavati Express : पंचवटी एक्स्प्रेसला पुन्हा विलंब चाकरमान्यांसह प्रवाशांचा संताप

Panchavati Express : पंचवटी एक्स्प्रेसला नाशिकला येताना व मुंबईला जाताना नियमितपणे उशीर होत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Panchavati Express : मुंबईला जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी हक्काची असलेल्या पंचवटी एक्स्प्रेसला नाशिकला येताना व मुंबईला जाताना नियमितपणे उशीर होत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. बुधवारी (ता. २४) गाडीला सायंकाळी मोठा विलंब झाला. यास कारण ठरत आहे ते पंचवटी रेल्वे गाडी हिंगोलीला जनशताब्दी म्हणून वापरली जात असल्याने. (delay in Panchavati Express anger passengers)

त्यामुळे पंचवटीला पूर्वीप्रमाणेच स्वतंत्र रेक (रेल्वे गाडी) देण्यासाठी खासदार राजाभाऊ वाजे यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी बाळासाहेब केदारे, बळवंत उगले, आकाश पवार, आनंद मुकणे, पोपटराव सोनवणे, राजेश फोकणे, किरण बोरसे, संजय शिंदे, कैलास बर्वे, दीपक कोपरगावकर, उज्वला कोल्हे, संतोष केदारे, मासिक पासधारक, यांनी केली. पंचवटी एक्स्प्रेस मुंबईहून सायंकाळी सव्वा सहाला नाशिकला निघते. मात्र, बुधवारी हिंगोलीहून जनशताब्दी मुंबईला साडेसहा वाजले तरी आली नव्हती. (latest marathi news)

त्यामुळे ही गाडी पंचवटी म्हणून सोडण्यास विलंब झाला. रात्री नाशिकला ही गाडी उशीरा पोचली. गेल्या काही दिवसांपासून पंचवटी सकाळी व संध्याकाळी उशिरा मुंबईला पोचत आहे. मुंबईहून पंचवटी कधी सुटणार, किती विलंब होणार या बाबत माईकवर उद्‌घोषणा केली जात नाही. त्यामुळे प्रवासी गोंधळतात. मुंबईतील रेल्वे अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. हिंगोलीहून गाडी आल्यावर पंचवटीची स्वच्छता केली जात नाही. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच पंचवटीसाठी स्वतंत्र रेकची मागणी सर्वांनी केली.

स्वतंत्र गाडी देण्यास टाळाटाळ

पंचवटीसाठी पूर्वीप्रमाणे स्वतंत्र गाडी देण्यास रेल्वेचे अधिकारी टाळाटाळ करत आहे. पंचवटीसाठी मुंबई स्थानकात पार्किंगला जागा नाही, देखभाल करता येत नाही, अशी कारणे नवीन रेकसाठी दिली जातात. तथापी, पंचवटीला पूर्वी पार्किंगसाठी जागा मिळत होती, पंचवटीची देखभाल मनमाडला केली जाते, असेही श्री. केदारे यांनी निर्दशनास आणून दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Rains : पश्चिम बंगालमध्ये पावसाचा कहर; दार्जिलिंगमधील भूस्खलनात आतापर्यत १८ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

Latest Marathi News Live Update: माढा तालुक्यातील पूरग्रस्त १८ गावांना विविध समाजसेवी संस्थांकडून मदतीचा ओघ

INDW vs PAKW: पाकिस्तानी कर्णधाराने चालू सामन्यात स्प्रे मारला, नंतर सर्वच खेळाडूंना मैदानाबाहेर काढलं; नेमकं काय घडलं?

Metro-3: अखेर प्रतिक्षा संपली! मेट्रो-३ चा वरळी-कफ परेड टप्पा ९ ऑक्टोंबरपासून प्रवासी सेवेत, जाणून घ्या तिकीट दर

Kojagiri Horoscope Prediction : उद्या कोजागिरी पौर्णिमेला बनतोय गजकेसरी आणि ध्रुव योग; या पाच राशींवर होणार धनलक्ष्मीची कृपा

SCROLL FOR NEXT