garbage van esakal
नाशिक

Nashik News : नियमित घंटागाड्या असूनही उघड्यावर साचतोय कचरा

Nashik News : कचरा फेकणाऱ्याकडून मोकळे प्लॉट, उघड्या गटारी, एवढेच नव्हे तर चक्क फुटपाथवरही कचरा फेकला जात असल्याने स्वच्छता विभागापुढील डोकेदुखी वाढली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : काही अपवाद वगळता शहराच्या सर्वच भागात व उपनगरांत नियमित घंटागाड्या सुरू आहेत. परंतु घंटागाडीत कचरा न टाकता थेट उघड्यावर कचरा टाकण्याच्या प्रकारात मोठी वाढ झाली आहे. कचरा फेकणाऱ्याकडून मोकळे प्लॉट, उघड्या गटारी, एवढेच नव्हे तर चक्क फुटपाथवरही कचरा फेकला जात असल्याने स्वच्छता विभागापुढील डोकेदुखी वाढली आहे. (Despite regular garbage van Garbage is piled up in open)

महापालिका स्वच्छता विभागाकडून शहराच्या सर्वच प्रभागांत घंटागाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. शक्यतो बहुतांशी भागात सकाळी या घंटागाड्या धावतात. परंतु अनेकजण घंटागाडीत कचरा न टाकता ड्यूटीवर व अन्य कामासाठी घराबाहेर जाताना चक्क कचऱ्याची पिशवी घेऊनच बाहेर पडतात.

त्यानंतर थेट चालत्या दुचाकी व चारचाकीतूनच कचरा फेकला जातोय. हा प्रकार हिरावाडी रोड, दिंडोरी रोड, पेठ रोड, संभाजीनगर रोड, नवीन शाही मार्ग, टाकळी रोड, तपोवन, महामार्गावरील सर्व्हीस रोड अशा सर्वच भागात कमी जास्त प्रमाणात आढळून येतो. विशेष म्हणजे यात केवळ अशिक्षितच नव्हे तर स्वतःला सुशिक्षित म्हणविणारांचाही मोठा समावेश आहे.

येथे टाकला जातोय कचरा

दिंडोरी रोडवरील सीडीओ- मेरी कार्यालय नजीकचा फुटपाथ, गोदावरी डावा कालवा परिसर, गणेशवाडीतील तीळेश्‍वर गणपती मंदिर समोर, वरुणा (वाघाडी), पेठ, दिंडोरी रोड, मखमलाबाद रोड, फुलेनगर परिसर, दत्तनगर, नवीन शाही मार्ग, टाळकुटेश्‍वर मंदिर परिसर, स्मृतिवन उद्यान परिसर, म्हसरूळ शिवारातील किशोर सूर्यवंशी मार्ग, नागचौक, रामवाडी परिसर आदी. (latest marathi news)

घंटागाडीतच कचरा टाका : संजय दराडे

महापालिकेतर्फे पंचवटी विभागासाठी ८३ घंटागाड्या कार्यान्वित आहेत. त्या विभागात फिरून कचरा संकलित करतात. त्यामुळे नागरीकांनी उघड्यावर कचरा न टाकता नियमित सुरू असलेल्या घंटागाडीतच कचरा टाकावा, असे आवाहन विभागीय स्वच्छता निरिक्षक संजय दराडे यांनी केले आहे. याबाबत व्यापक जनजागृती मोहीम हाती घेणार आहोत, याउपर उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर स्वच्छता निरीक्षकांच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई सुरू आहे.

मान्सूनपूर्व स्वच्छता मोहीम सुरू

महापालिकेच्या पंचवटी विभागातर्फे बुधवार (ता. १५) पासून मान्सूनपूर्व स्वच्छता मोहिमेस सुरवात झाली आहे. यात विविध नाले, उद्याने, मोकळे भूखंड, सार्वजनिक जागा, गोदाघाट परिसर याची स्वच्छता करण्यात येणार आहे. हे काम या महिन्यातच पूर्ण करण्याचा मानस स्वच्छता व आरोग्य विभागातर्फे करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शेतकऱ्यांच्या DBT वर दसऱ्यापर्यंत मदत जमा करणार'; अजित पवार यांचे आश्‍वासन, सर्वांना सोबत घेऊन चालण्याचीही दिली ग्वाही

Pune Traffic App : वाहनचालकांवर मोबाईलवरूनच कारवाई, ‘पुणे ट्रॅफिक’ ॲपला प्रतिसाद; आतापर्यंत ४२ हजार तक्रारी

Shivram Bhoje Death : ख्यातकीर्त ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांचे निधन, कसबा सांगाव येथे आज होणार अंत्यसंस्कार

Latest Marathi News Updates : ख्यातकीर्त ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांचे निधन, कसबा सांगावात आज अंत्यसंस्कार

Mumbai Monorail : मुंबईकरांसाठी मोठी बातमी ! मोनोरेल अनिश्चित काळासाठी बंद , MMRDA ने का घेतला निर्णय ?

SCROLL FOR NEXT