Fund  esakal
नाशिक

Nashik News : वारंवार सूचना देऊनही निधी खर्चाला मिळेना मुहूर्त; केंद्राकडून गंभीर दखल

Nashik : केंद्र शासनाने उपलब्ध करून दिलेला ८७ कोटी रुपयांचा निधी अद्यापही खर्च होत नसल्याने अखेरीस केंद्राकडूनच जूनअखेर ४५ टक्के निधी खर्च करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत नाशिक महापालिकेसाठी केंद्र शासनाने उपलब्ध करून दिलेला ८७ कोटी रुपयांचा निधी अद्यापही खर्च होत नसल्याने अखेरीस केंद्राकडूनच जूनअखेर ४५ टक्के निधी खर्च करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अर्थात नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम (एन-कॅप) अंतर्गत हवा स्वच्छ ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहे. त्यासाठी केंद्र शासनाकडून विविध योजनांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. ( Despite repeated instructions funds are not being spent taking serious notice from Centre )

नाशिक महापालिकेला या उपक्रमाअंतर्गत ८७ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. केंद्र सरकारने निश्चित करून दिलेल्या कालावधीमध्ये निधी खर्च करणे अपेक्षित आहे. या संदर्भात वारंवार सूचना देऊनही महापालिकेकडून निधी खर्च झाला नाही. आडगाव येथे बस डेपो उभारणीसाठी २८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली, मात्र आत्तापर्यंत सात कोटी रुपये निधी पीएम बस योजनेतून अनुदान स्वरूपात मिळाले.

उर्वरित निधी एन कॅप योजनेअंतर्गत खर्च केले जाणार आहे. मात्र हे काम कार्यारंभ आदेश देण्यापुरतेच मर्यादित राहिले आहे. शहरात यांत्रिकी पद्धतीने झाडलोट करण्यासाठी यांत्रिकी झाडू खरेदी करण्यात आले आहे. त्यासाठी दहा कोटी २५ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. पंचवटी अमरधाममध्ये विद्युतदाहिनी बसविण्याचे काम सुरू आहे.

शहरात वीस ठिकाणी इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. त्र्यंबक रोडवर सायकल ट्रॅक व उद्यान विभागामार्फत प्रलंबित आहे. निधी खर्च करण्यासंदर्भात केंद्र शासनाच्या स्पष्ट सूचना असतानादेखील खर्च न झाल्याने गंभीर दखल घेण्यात आले.

प्रकल्पांना गती देण्याच्या सूचना

निधी खर्च करण्यासंदर्भात शुक्रवारी (ता.७) महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात तातडीची बैठक घेण्यात आली. या वेळी ‘एन- कॅप’ अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या कामांचा अहवाल सादर करण्यात आला. या वेळी प्रकल्पांना गती देण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या. केंद्र शासनाने जूनअखेर ४५ टक्के एकूण प्राप्त निधीच्या ४० कोटी निधी खर्च करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

त्याअनुषंगाने प्रकल्पांना गती देण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, स्मिता झगडे, परिवहन विभागाचे उपायुक्त अजित निकत, शहर अभियंता संजय अग्रवाल, विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत, उद्यान विभागप्रमुख विवेक भदाणे, कार्यकारी अभियंता बाजीराव माळी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Latest Marathi News Updates: गेवराईच्या पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT