MLA Rahul Dhikle speaking at the commencement of development works worth four crores in Ward Two in Adgaon. dignitaries with esakal
नाशिक

Nashik News : आडगाव येथील प्रभाग दोनमध्ये 4 कोटींच्या विकासकामांचा प्रारंभ

Nashik : प्रभाग क्रमांक २ आडगाव येथे चार कोटींच्या निधीतून होणार असलेल्या विविध विकासकामांचा प्रारंभ आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते झाला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : येथील प्रभाग क्रमांक २ आडगाव येथे चार कोटींच्या निधीतून होणार असलेल्या विविध विकासकामांचा प्रारंभ आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते झाला. यात अभ्यासिका बांधणे एक कोटी, मळे परिसर रस्ते खडीकरण-डांबरीकरण दोन कोटी, नेत्रावती नदीलगतच्या नाल्यावर पूल बांधणे-एक कोटी या कामांचा समावेश आहे. आमदार ढिकले म्हणाले, की गावात मोठी अभ्यासिका व वाचनालय नसल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी विविध अडचणी यायच्या. ()

यासाठी एक कोटी इतका निधी मंजूर करून घेतला. लवकरच अद्ययावत व भव्य अशी अभ्यासिका विकसित होईल. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. गावातील मळे परिसरात चांगले दर्जेदार रस्ते नसल्याने शेतकरी, ग्रामस्थांना बराच त्रास सहन करावा लागत होता, यामुळे परिसरातील रस्ते खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी दोन कोटी निधी मंजूर करून घेतला आहे. (latest marathi news)

लवकरच रस्त्यांची कामे पूर्ण होऊन शेतकरी व ग्रामस्थांचे दळणवळण सोपे होईल. नेत्रावती नदीलगत पावसाळी नाल्यावर पूल बांधण्यासाठी एक कोटी निधी मंजूर केला आहे. लवकरच पुलाचे काम पूर्ण होईल. या सर्व कामांमुळे गावाच्या विकासात निश्चित भर पडेल.

नाशिक पूर्व मतदारसंघात अनेक विकासकामे प्रगतिपथावर असून, आगामी काळात विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देणार आहे. मतदारसंघात नियोजनात्मक विकासकामे व्हावीत, हीच आपल्या सर्वांची अपेक्षा असते. त्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन, असे आश्वासन आमदार ढिकले यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ishan Kishan Century: १५ चौकार, ६ षटकार! कर्णधार इशान किशनचे थोडक्यात हुकले द्विशतक, टीकाकारांना दिले उत्तर...

बँकेच्या चुकीने UPSCची मुख्य परीक्षा हुकली, SBI तरुणाला देणार ७ लाखांची भरपाई; काय घडलं?

Diamond mine: भारतातला असा जिल्हा जिथे रस्त्यावरही हिरे सापडतात; काय आहे पन्ना डायमंड बेल्ट?

Doctor's Advice Medicine for Kids: डॉक्टरांचा सल्ला घ्या अन् गरज भासल्यासच मुलांना औषधे द्या! भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या सूचना

शिंदेंच्या आमदाराचा फुकटचा राडा, कँटिन नाहक बदनाम; अन्न आणि औषध प्रशासनाकडून क्लीन चीट

SCROLL FOR NEXT