While showing the resignation letter, Dr. Tushar Shewale, along with Vikram Pawar and Sudhakar Nikam
While showing the resignation letter, Dr. Tushar Shewale, along with Vikram Pawar and Sudhakar Nikam esakal
नाशिक

Dhule Loksabha Constituency : कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांचा राजीनामा!

प्रमोद सावंत

मालेगाव : धुळे लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीतर्फे कॉंग्रेसच्या उमेदवारम्हणून डॉ. शोभा बच्छाव यांची उमेदवारी जाहीर होताच त्याचे येथे तीव्र पडसाद उमटले. डॉ. बच्छाव या मतदार संघाबाहेरच्या आहेत. आयात उमेदवार चालणार नाही. आपण त्यांचे काम करणार नाही अशी घोषणा करतानाच गुरुवारी (ता. ११) पासून कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहोत. राजीनामा पत्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पाठविल्याचे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले. (Nashik Congress District President Dr Tushar Shewale resignation news)

तालुका कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉ. बच्छाव यांच्या उमेदवारीबद्दल यावेळी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. दरम्यान पत्रकार परिषद आटोपताच कॉंग्रेसच्या उमेदवार डॉ. शाेभा बच्छाव या पती डॉ. दिनेश बच्छाव यांच्यासह मोसम पुल चौकातून येथील कॉंग्रेस कार्यालयात डॉ. शेवाळे व पदाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी आल्या असता कार्यकर्त्यांनी त्यांच्या समोरच आयात उमदेवार चालणार नाही.

यासह जोरदार घोषणाबाजी केली. डॉ. दिनेश बच्छाव यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढत पक्ष कार्यालयातून काढता पाय घेतला. यावेळी डॉ. शेवाळे हे चौकातील महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी गेलेले होते. त्या दरम्यानच ही घोषणाबाजी व नाराजी नाट्य घडले.

पत्रकार परिषदेत डॉ. शेवाळे म्हणाले, की कॉंग्रेसच्या ज्या नेत्यांवर आम्ही विश्‍वास ठेवला. त्यांच्या खांद्यावर मान ठेवली त्यांनीच आमची मान कापून टाकली. गेल्या तीन लोकसभा निवडणुकीपासून आपण पक्षाकडे लोकसभेसाठी उमेदवारी मागत आहोत.

पक्षाने सतत डावलल्यानंतरही कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता पक्षाच्या अवघड काळात प्रामाणिकपणे काम केले. पक्ष वाढवला. जलसंवर्धन, सैनिक सेवा, आरोग्य शिबीर, सिंचन यासह विविध सामाजिक कार्यदेखील मोठ्या प्रमाणात सुरु ठेवले. धुळे लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या सुख-दु:खात सहभागी होत जनसंपर्क कायम ठेवला.

यावेळी या मतदारसंघातून धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शाम सनेर व मी स्वत: असे प्रामुख्याने दोन इच्छूक होते. दोघांपैकी कोणाच्याही एका नावावर एकमत झाले असते. कॉंग्रेसने मतदार संघात प्रबळ उमेदवार देऊन विजयी होण्याची संधी घालविली आहे. पक्षाने बाहेरील उमेदवाराला संधी दिली.

त्यांना त्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या नाशिकने देखील अडगळीत टाकले आहे. कुठल्याही परिस्थितीत डॉ. शोभा बच्छाव यांचे काम करणार नाही. पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या उमेदवारीचा फेर विचार करावा. नेत्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. केंद्रीय नेत्यांना आपण दोष देणार नाही. मात्र मी स्वत: जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे.

पक्षाला व जिल्हा कार्यकारिणीला यासाठी वेठीस धरणार नाही. कार्यकर्त्यांना तुर्त सबुरीचा सल्ला दिला आहे. तथापि पत्रकार परिषदेत तालुक्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी आपण डॉ. शेवाळे यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. याच कारणावरुन धुळे जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष शाम सनेर यांनीदेखील जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. उत्तर महाराष्ट्रात कॉंग्रेसला हे दोन मोठे धक्के मानले जात आहेत.  (Nashik Political News)

यावेळी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे, महिला आघाडीच्या अध्यक्षा मंगला तलवारे, कॉंग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष सतीश पगार, वैद्यकीय सेलचे अध्यक्ष डॉ. अरुण पठारे, जिल्हा सरचिटणीस नितीन बच्छाव, विक्रम पवार, संदीप निकम, साहेबराव देवरे आदींसह बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

डॉ. शोभा बच्छाव माघारी

धुळे लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर डॉ. शोभा बच्छाव येथील पक्ष कार्यालयात आल्या असता कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत आयात उमेदवार चालणार नाहीची घोषणाबाजी केली. यावेळी डॉ. दिनेश बच्छाव यांनी डॉ. शेवाळे व आम्ही विद्यार्थी दशेपासून मित्र आहोत.

त्यांचे व माझे गाव शेजारी आहे. आम्ही कधीही एकमेकांविरुध्द नव्हतो. उमेदवारीसाठी देखील इच्छूक नव्हतो. दिल्लीहून गेल्या आठवड्यातून दुरध्वनी आल्यानंतर डॉ. शेवाळे यांना दादा तुम्ही लक्ष घाला असे सांगितले होते. पक्षाने निर्णय घेतला. दादा माझ्या भावासारखे आहेत.

त्यांच्यासाठी काय करता येईल हे पाहू असे सांगून कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. तुम्ही उमेदवारी मागे घ्या. उमेदवारी अर्ज भरु नका. पक्षाला कळवा. इच्छूक नव्हते तर मग पेढे का वाटले? असा जाब कार्यकर्त्यांनी विचारल्यानंतर डॉ. बच्छाव या माघारी फिरल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''तब्येत खराब आहे तर प्रचार का करता?'', भर कोर्टात ED ने केजरीवालांना केला सवाल, म्हणाले...

T20 World Cup 2024 : आयसीसीनं स्पर्धेतील प्रमुख संघाची जर्सी केली बॅन! टी20 वर्ल्डकपला वादाची किनार?

Israel on All eyes on Rafah : 7 ऑक्टोबरला तुमचे डोळे फुटलेले का? इस्रायलचे 'त्या' व्हायरल फोटोला प्रत्युत्तर

Pune Porsche Accident: कारच्या फिचरमुळं सापडला कल्याणीनगर अपघातातला अल्पवयीन आरोपी नाहीतर...; प्रत्यक्षदर्शीने सांगितली हकीकत

Amruta Khanvilkar: मराठमोळी अमृता खानविलकर झळकणार हिंदी वेब सीरिजमध्ये; '36 डे ' चा ट्रेलर पाहिलात का?

SCROLL FOR NEXT