Tata Power officers Mangesh Kale, Sujit Roy, Ahmed Raja, Darishsheel Patil, Avinash Khonde along with the students after the commissioning of the solar system. esakal
नाशिक

Nashik News : टाटा सोलर सिस्टिममुळे डिजिटल शाळा चमकणार! 3 शाळांना टाटा पावर कंपनीतर्फे सोलर सिस्टीम भेट

Nashik : नांदगाव तालुक्यातील लांबबर्डी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पांझण सोसायटी व मन्याड चौकी या शाळांना टाटा पॉवर कंपनीतर्फे सीएसआर फंडातून २ किलो वॅट क्षमतेचे संपूर्ण सोलर इन्व्हर्टर सिस्टिम देण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नांदगाव तालुक्यातील लांबबर्डी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पांझण सोसायटी व मन्याड चौकी या शाळांना टाटा पॉवर कंपनीतर्फे सीएसआर फंडातून २ किलो वॅट क्षमतेचे संपूर्ण सोलर इन्व्हर्टर सिस्टिम देण्यात आली आहे. लांबबर्डी (साकोरा) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोलर सिस्टिमचे उद्घाटन करण्यात आले. (nashik Tata Solar System marathi news)

टाटा पॉवर कंपनीचे स्टोअर इन्चार्ज मंगेश काळे, सेफ्टी ऑफिसर सुजित रॉय, अहमद राजा, इंजिनिअर धैर्यशील पाटील व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते. सोलर इन्व्हर्टर सिस्टीममुळे शाळेतील विजेचा प्रश्‍न सुटला आहे. सर्वच जिल्हा परिषद शाळा डिजिटल झाल्या आहेत. परंतु, विजेच्या समस्येमुळे डिजिटल साधने वापरणे गैरसोयीचे ठरते. शाळांना व्यापारी दराने भरमसाठ वीजबिल येते. (latest marathi news)

त्यामुळे वीजबिल न भरल्यामुळे वीज कनेक्शन खंडित होते. प्रत्येक शाळेस समाजाचा सहभाग किंवा शासकीय योजनेतून या प्रकारची सोलर सिस्टिम उपलब्ध झाल्यास विजेची समस्या कायमची दूर होईल. खऱ्या अर्थाने डिजिटल साधनांचा विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना उपयोग करता येईल. दरम्यान, यावेळी उमेश बोरसे यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक अविनाश खोंडे यांनी आभार मानले.

तीन शाळांनाही यापूर्वी मदत

केंद्र सरकारने पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली आहे. या योजनेत देशातील एक कोटी घरांवर सोलर पॅनेल बसवले जाणार आहेत. या योजनेसाठी ७५ हजार कोटी अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या योजनेतून जिल्हा परिषद प्राथमिक शाळांनाही लाभ देण्यात यावा. टाटा पॉवर कंपनीने यापूर्वीही तीन शाळांना स्मार्ट ॲक्टिव्ह डिजिटल बोर्ड भेट दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Budget 2026 : देशाचा अर्थसंकल्प सोप्या भाषेत समजून घ्यायचा आहे? मग हे नक्की वाचा

Teddy Day 2026: या रंगाचा 'Teddy' देऊ नका, नाहीतर पार्टनर होईल नाराज! जाणून घ्या आज इंप्रेस करण्याचे खास टिप्स

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चैत्यभूमीवर दाखल

HSC English Exam: इंग्रजीच्या पेपरने बारावीला सुरुवात; पोलिसांचा खडा पहारा

Jamkhed Crime: फोनवर बोलत नसल्याच्या रागातून नृत्यांगणेवर हल्ला; जामखेडमधील धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT