Malti Dhomse esakal
नाशिक

Dindori Lok Sabha Constituency : ‘वंचित’च्या मालती ढोमसे खर्च आढावा बैठकीस गैरहजर

Lok Sabha Constituency : दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार मालती ढोमसे यांनी दुसऱ्यांदा खर्च सादर न केल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार मालती ढोमसे यांनी दुसऱ्यांदा खर्च सादर न केल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. उर्वरित नऊ उमेदवारांनी खर्च सादर केला असून, खर्चात डॉ. भारती पवारांनी आघाडी घेतली. दिंडोरी लोकसभा मतदारसंघांचे खर्च निरीक्षक मुकांबिकेयन एस. व निधी नायर यांनी सोमवारी (ता. १३) शासकीय विश्रामगृहात उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली. (Dindori Lok Sabha Constituency)

या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब पारधे, नोडल अधिकारी भालचंद्र चव्हाण, सहाय्यक बाबासाहेब शिंदे, गोविंद कतलाकुटे, जलपत वसावे, प्रसाद कुलकर्णी, कोठावदे, बाविस्कर, पटेल, नंदन, नायर, उमरे उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार मालती ढोमसे यांनी खर्च सादर केला नाही. उर्वरित सर्व उमेदवारांनी खर्च सादर केला असून, खर्च निरीक्षकांनी प्रसिद्ध केला आहे. (Latest Marathi News)

आजपासून टपाली मतदान

लोकसभा निवडणुकीसाठी २१ हजार ११० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी मंगळवार (ता. १४)पासून पुढील तीन दिवस टपाली मतदानास प्रारंभ होत आहे. दिंडोरीतील कर्मचाऱ्यांसाठी दिंडोरी उपविभाग तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध आहे;

तर नाशिक लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावरील टपाली मतपत्रिका नाशिकच्या तहसील कार्यालयात उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

Latest Marathi News Updates : पुण्यात पुढचे ३ तास धोक्याचे, मुसळधार पावसाची शक्यता

Chandrapur News : पतीचं दुखणं बरं होईना, जमापुंजीही संपली; बिल कसं भरायचं? पैसे नसल्यानं पत्नीनं रुग्णालयातच संपवलं जीवन

Solapur News: 'बेपत्ता रिक्षाचालकाचा ‘सीडीआर’वरून शोध'; दुसऱ्या दिवशीही सापडला नाही, जुना पूना नाका ते देगाव ब्रीजपर्यंत शोधले

Solapur Rain : कोरड्याठक सीना नदीला २५ वर्षांत पहिल्यांदाच भयंकर पूर, १० गावे पाण्याखाली, हजारो नागरिकांचा संपर्क तुटला

SCROLL FOR NEXT