Remaining dead water in Ozarkhed dam.Prepared rice seedlings. esakal
नाशिक

Nashik Monsoon Dealey : जून सरला तरी धरणे कोरडीठाक! दिंडोरी तालुक्यातील चित्र

Monsoon Dealey : दिंडोरी तालुक्यातील सहाही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस नसल्याने तीन धरणे कोरडीठाक आहेत.

दिगंबर पाटोळे, सकाळ वृत्तसेवा

Nashik Monsoon Dealey : दिंडोरी तालुक्यातील सहाही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस नसल्याने तीन धरणे कोरडीठाक आहेत. पालखेड धरण वगळता दोन धरणांमध्ये अवघा सरासरी २ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. दरम्यान, पेरण्यांसाठी पुरेसा पाऊस नसल्याने पेरण्याही खोळंबल्या असून, तालुक्यातील खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या आहेत. दिंडोरी तालुक्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, जूनच्या पहिल्या आठवड्यात व मध्यास काही ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाला. (Dindori taluka where dams are dry even in June)

त्यानंतर तुरळक प्रमाणात पाऊस होत गेल्याने सोयाबीन, मका, उडीद, मुग, लाल कांदा, टोमॅटो, भात, भाजीपाल्याची बियाणे पेरण्यात आली. मात्र, गेल्या दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने व उष्णताही वाढल्याने पेरलेली पिके करपण्याची भिती निर्माण झाली आहे. तर राहिलेली व दुसऱ्या टप्प्यातील पेरणीही लांबणीवर पडली आहे. पेरलेल्या पिकांतील अतर्गंत मशागतीची कामेही जवळपास पूर्ण झाली असून, शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे.

दरम्यान, आतापर्यंत एकही दमदार पाऊस न झाल्याने तालुक्यातील नदी-नाले अजूनही कोरडीच आहे. तर तालुक्यातील धरणांच्या साठ्यात वाढ न होता उलट घट झाली आहे. दुसरीकडे शेतातील विहिरीतही अद्याप पाणी उतरले नसल्याने त्याही कोरड्याच आहे. दरम्यान, येत्या पाच-सहा दिवसांत पाऊस न झाल्यास पेरणीचे संकट बळीराजापुढे उभे राहाणार आहे.

टोमॅटोची नुकतीच लागवड झालेली रोपे पावसाच्या उघडीपीमुळे मरु नये म्हणून रोपांना ड्रीपच्या सहाय्याने तर काही ठिकाणी हंडा, बादलीच्या सहाय्याने पाणी आणून रोपांना पाणी द्यावे लागत आहे. तालुक्याच्या पश्‍चिम भागात भाताची रोपे तयार होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, पाऊस नसल्याने आवणीची कामे खोळंबली आहेत.

तालुक्यातील ६९५.९० मिमी वार्षिक सरासरी पर्जन्यमानापैकी २८ जूनअखेर जून महिन्यातीत सरासरी ११० मिमी पावसापैकी १०२ ८२.८ टक्के पाऊस झाला आहे. दुसरीकडे तालुक्यातील ओझरखेड, पुणेगाव व तिसगाव धरणे अद्याप कोरडीच असून, बाकी धरणांमध्ये अवघा २ टक्केच साठा शिल्लक आहे. (latest marathi news)

२८ जून रोजीचा उपयुक्त साठा (द.ल.घ.फु) कंसात टक्केवारी

पालखेड १०२ (१५.७७)

करंजवण ९९ (१.८४)

वाघाड ६४ (२.७८)

ओझरखेड ० (०)

पुणेगाव ० (०)

तिसगाव ० (०)

खरीप हंगामातील आराखडा (कसांत प्रत्यक्ष पेरणी)

भात : ५५६० हेक्टर (५०८ रोप लागवड)

मका : २१०३ हेक्टर (१८ हे.)

सोयाबीन : ४५७१ हेक्टर (१९२४ हे.)

भुईमूग : २६०१ हेक्टर (१९२४ हे.)

नागली : १००० हेक्टर (६८ हेक्टर)

वरई : ८०० हेक्टर (१८७ रोप लागवड)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT