Bribe Crime  esakal
नाशिक

Nashik Bribe Crime : लाचखोर गर्गेची उचलबांगडी; अटकपूर्व जामीनावर उद्या सुनावणी

Nashik News : दीड लाख रुपयांच्या लाचखोरीच्या गुन्ह्यात फरार असलेले पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांचा पदभार शासनाने काढून घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : दीड लाख रुपयांच्या लाचखोरीच्या गुन्ह्यात फरार असलेले पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांचा पदभार शासनाने काढून घेतला आहे. तर, गर्गे यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली असून त्यावर शुक्रवारी (ता.१७) सुनावणी होणार आहे. (Nashik Crime News)

गेल्या ७ मे रोजी दीड लाखांच्या लाचप्रकरणी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे आणि नाशिकच्या सहायक संचालक आरती आळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून डॉ. गर्गे फरार आहेत तर, आरती आळे या प्रसूती रजेवर असल्याने त्यांना नोटीस बजावून त्यांची चौकशी केली जात आहे.

गेल्या आठवडाभरापासून फरार असलेले लाचखोर गर्गे यांचा शासनाने पदभार काढून घेत पुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुजितकुमार उगले यांच्याकडे अतिरिक्त पदभार दिला आहे. तसेच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शासनाकडे गर्गे यांच्यावर निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव दिला आहे.

तर, दुसरीकडे गर्गे यांच्या नाशिकमधील कुटुंबीयांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी केली जात आहे. यामुळे लपतछपत फिरणारे गर्गे यांची नाकाबंदी करण्याचा प्रयत्न लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे. त्यांचे मुंबईतील महालक्ष्मी रोड, रेसकोर्सजवळील घर सील केले आहे.

जामिनास विरोधाची शक्यता

लाचखोर गर्गे यांनी अटकपूर्व जामिनासाठी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. त्यासंदर्भात शुक्रवारी (ता.१७) सुनावणी होणार आहे. मात्र गर्गे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असल्याने त्यांच्या अटकपूर्व जामिनाविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जोरदार विरोध होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT