Radhakrishna Vikhe Patil  esakal
नाशिक

Radhakrishna Vikhe Patil : भाजपच्या बैठकीला 1500 बूथप्रमुखांची दांडी; विखे-पाटील यांची नाराजी

Radhakrishna Vikhe Patil : दिंडोरी-शिर्डी व नाशिक या लोकसभा मतदारसंघ भ्रष्टाचार बैठकीला एक हजार ९०० पैकी दीड हजार बूथप्रमुखांनी दांडी मारली.

सकाळ वृत्तसेवा

Radhakrishna Vikhe Patil : दिंडोरी-शिर्डी व नाशिक या लोकसभा मतदारसंघ भ्रष्टाचार बैठकीला एक हजार ९०० पैकी दीड हजार बूथप्रमुखांनी दांडी मारली. यावर नाराज झालेल्या महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी झाडाझडती घेत, ‘असे चालले तर नाशिकची जागा कशी मिळेल’, असे उद्विग्न उद्‍गार काढले. नाशिक-दिंडोरी व शिर्डी लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक शुक्रवारी (ता. २३) नाशिकमध्ये पार पडली. (nashik Displeasure of Radhakrishna Vikhe Patil marathi news)

या वेळी या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी असलेल्या महसूलमंत्री विखे-पाटील यांनी बूथप्रमुखांच्या उपस्थितीवर नाराजी व्यक्त केली. या वेळी त्यांनी नाशिकची जागा मिळविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले. विखे-पाटील यांचे भाषण सुरू असताना खुर्च्या रिकाम्या दिसत असल्याने त्यांनी कानउघाडणी केली.

ज्यांना पक्षासाठी वेळ देता येत नाही त्यांना बदलून टाका. एक हजार ९०० बूथप्रमुख असताना तीनशे लोकसुद्धा दिसत नाही; त्यामुळे लोकसभेची जागा मागताना दबाव कसा निर्माण होईल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, की सरकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य लोकांना मिळवून द्या, ८० टक्के लोकांना आनंदाचा शिधा वाटप झाला आहे.

धान्य वाटपामध्ये राज्य सरकार अग्रेसर आहे. सरकारच्या योजनांचे फलक सर्व गावांमध्ये लावावे. ‘हर घर जल योजना’ लोकांपर्यंत पोचवावी, आपल्या योजनांचे मार्केटिंग स्वतःच करावे. देशाला पर्याय देण्यासाठी विरोधी पक्षांकडे कोणीही चेहरा नाही, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचा विजय निश्चित आहे.

लोकांपर्यंत योजना पोचवा

पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी विजय चौधरी यांनी लोकसभेचा नाशिक मतदारसंघ आपल्याकडेच राहील, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. रुसवे-फुगवे बाजूला ठेवून जो उमेदवार पक्षाच्या वतीने दिला जाईल त्याला निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. कलम ३७० हटविणे, राममंदिर उभारणी, कोरोना कालावधीत मोदी सरकारने केलेली कामे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT