corona-virus-getty.jpg 
नाशिक

Coronaupdate : जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात ५१५ नवे रुग्ण, तर ४२८ जणांची कोरोनावर मात!

अरुण मलाणी : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गुरुवारी (ता. २३) दिवसभरात जिल्ह्यात ५१५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले, तर दुसरीकडे ४२८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्याच वेळी शहरात नऊ, ग्रामीण भागात दोन आणि मालेगाव व अन्य जिल्ह्यातील प्रत्येकी एक असे १३ रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. 

कोरोनाबळींची एकूण संख्या ४३३

बरे झालेल्या रुग्णांमध्ये २८८ नाशिक शहरातील, १३८ ग्रामीण भागातील, तर दोन जिल्हाबाह्य रुग्ण आहेत. सध्या कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंवर नियंत्रण मिळविण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेपुढे आहे. रुग्णांनीदेखील वेळीच उपचार प्रक्रियेत दाखल होणे आवश्‍यक आहे. दरम्यान, गुरुवारी झालेल्या १३ मृत्यूंपैकी नऊ शहरातील आहेत. त्यात जुने नाशिक परिसरातील ४८ वर्षीय, इंदिरानगर येथील ७६ वर्षीय, सातपूर येथील ५६ वर्षीय, दिंडोरी नाका येथील ७८ वर्षीय, सातपूर येथील ९२ वर्षीय, जय भवानी रोड येथील ७२ वर्षीय, कृष्णानगर, अग्रवाल वाडी येथील ४९ वर्षीय, सायखेडा रोडवरील ७८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. 

7 हजार 798 कोरोनामुक्त

दिवसभरात आढळलेल्या ५१५ रुग्णांत ३७७ जण नाशिक शहरातील आहेत. ग्रामीण भागातील १३०, तर मालेगाव महापालिका हद्दीतील आठ रुग्ण आहेत. जिल्ह्यात सध्या अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 10 हजार 969 असून, 7 हजार 798 कोरोनामुक्त झाले आहेत. मालेगाव येथील ५८ वर्षीय महिला आणि अकोले (जि. नगर) येथील ६८ वर्षीय पुरुषाचाही कोरोनाने मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात खेडगाव येथील ७९ वर्षीय पुरुष आणि देवळाली कॅम्प येथील ८० वर्षीय पुरुषाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबळींची एकूण संख्या ४३३ झाली आहे. 

तेराशे संशयित दाखल 

तपासणी मोहिमांमुळे प्राथमिक स्तरावर रुग्ण उपचार प्रक्रियेत येत आहेत. यामुळे संशयित रुग्णांची संख्यादेखील वाढली आहे. गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यात एक हजार ३०० संशयित दाखल झाले. यांपैकी ७६७ रुग्ण नाशिक शहरातील, तर ३५२ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. मालेगाव महापालिका हद्दीतही १६ संशयित दाखल असून, गृह विलगीकरणात १६५ संशयितांचा समावेश आहे. सायंकाळपर्यंत तब्बल ९४३ अहवाल प्रलंबित होते.  

(संपादन - किशोरी वाघ)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashutosh Ranka Detained : कॉकरोच जनता पार्टीचे नेते आशुतोष रांका यांच्यासह अनेकांना आसाममध्ये घेतलं ताब्यात

Central Railway: दिवाळी, छठपूजेसाठी मध्य रेल्वेच्या ४१८ गाड्या, आरक्षण सुरू; 'अशी' करा सीट बुक

IND vs WI, 1st ODI: नमन धीरचे भारतासाठी पदार्पण! जडेजाचे कमबॅक, पण सिराजला जागा नाही; कशी आहे Playing XI

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

Uttarakhand: बद्रीनाथमध्ये हंगामातील पहिला स्नोफॉल; आदि कैलाश यात्रा रोखली, दरडी कोसळल्याने रस्ते ठप्प

SCROLL FOR NEXT