crop loan esakal
नाशिक

Nashik District Bank : खरिपासाठी 253 कोटींचे कर्जवाटप : जिल्हा बॅंकेकडून दिलासा

District Bank : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने यंदाच्या खरीप हंगामासाठी ५९६.३६ कोटींचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik District Bank : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने यंदाच्या खरीप हंगामासाठी ५९६.३६ कोटींचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. १ एप्रिलपासून पीककर्ज वाटपास सुरवात झाली असून, आतापर्यंत २५३.२१ कोटींचे पीककर्ज वाटप झाले आहे. जिल्ह्यातील कर्जवाटपाचे हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या ४० टक्के इतके पूर्ण झाले आहे. आतापर्यंत सर्वाधिक कर्ज निफाड तालुक्यात तर सर्वांत कमी कर्ज त्र्यंबकेश्वर तालुक्यात वाटप झाले आहे. (District Bank 253 Crore Loan Disbursement for Kharif )

आगामी कृषी वर्षासाठी जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामासाठी ६२८.०६ कोटींचे कर्जवाटपाचे लक्षांक निश्चित करण्यात आला आहे. गतवर्षी हा लक्षांक ६१५ कोटींचा होता. यंदा त्यात काहीशी वाढ झाली आहे. यात खरिपासाठी ५९६.३६ कोटींचे उद्दिष्ट आहे. तर रब्बी हंगामासाठी ३१.७० कोटींचे उद्दिष्ट आहे. खरीप हंगामासाठी १ एप्रिल २०२४ पासून कर्जवाटप सुरू झाले असून, आतापर्यंत एकूण २३ हजार २४ हेक्टर क्षेत्रावरील २६ हजार ३३३ शेतकऱ्यांना १५ मे २०२४ अखेर २५३.२१ कोटींचे कर्जवाटप झाले आहे. खरिपासाठी सरासरी ४२ टक्के कर्जवाटप झाले आहे.

असे आहे मेअखेरपर्यंतचे वाटप

निफाड ः ७९.२५ कोटी

येवला ः ३५.८४ कोटी

मालेगाव ः २३.३२ लाख

देवळा ः १०.१६ लाख

इगतपुरी ः २३.९९ लाख

कळवण ः ८.५५ लाख

दिंडोरी ः २३.९९ लाख

नांदगाव ः १०.०५ लाख

नाशिक ः २०.०८ लाख

पेठ ः २२ लाख

सटाणा ः १६.१४ लाख

सिन्नर ः ८.८९ लाख

त्र्यंबकेश्वर ः ०१.८५ लाख

चांदवड ः १५.५० लाख (latest marathi news)

कर्ज मागणी वाढणार

जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईचे गंभीर संकट आहे. टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यातच मॉन्सून अद्याप महाराष्ट्रात दाखल झालेला नाही. यंदा समाधानकारक मॉन्सून असणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे पीककर्ज मागणी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांना येत्या ३० सप्टेंबरपर्यंत पीककर्ज घेता येणार आहे.

खरीप पीककर्ज दृष्टिक्षेपात

पीककर्जाचे एकूण उद्दिष्ट ः ५९६.३६ कोटी

आतापर्यंत झालेले वाटप ः २५३ कोटी २२ लाख

लाभ घेतलेले एकूण शेतकरी ः २६ हजार ३३३

पीककर्जाचा लाभ झालेले क्षेत्र ः २३ हजार हेक्टर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT