brahmagiri hills nashik esakal
नाशिक

Nashik News : ब्रह्मगिरीवर ‘एससी सरकार’चा स्तंभ; जिल्हाधिकारी जलज शर्मांचे गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Nashik : लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापत असताना जिल्ह्यात समांतर सरकारचा दावा करणाऱ्या ‘एसी सरकार’ विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापत असताना जिल्ह्यात समांतर सरकारचा दावा करणाऱ्या ‘एसी सरकार’ विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत. ब्रिटनच्या राणीला मानणारा एसी सरकार समूह भारत सरकारला मानत नाही. त्र्यंबकेश्वरमध्ये ‘एसी सरकार’ने स्तंभ उभारत थेट ब्रह्मगिरी पर्वतावर दावा केला आहे. (nashik District Collector Jalaj Sharma has ordered to file case against sc government claiming parallel government in district marathi news)

नाशिक-गुजरातच्या सीमा भागात डांग परिसरात हा समूह सक्रिय आहे. त्यांनी स्तंभ उभारल्यानंतर त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला. ‘एसी’ने उभारलेल्या स्तंभावर अशोक स्तंभासह अनाकलनीय भाषेतील मजकूर आहे. ब्रह्मगिरी पर्वत वन विभागाच्या अखत्यारित येतो. मात्र, वन विभागाकडे याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही.  (latest marathi news)

काही दिवसांपूर्वी गडचिरोली भागात या ‘एसी सरकार’ला मानणाऱ्या अनुयायांनी मतदान करू नका, असे तेथील ग्रामस्थांना सांगितले. त्यानंतर पुन्हा हे सरकार चर्चेत आले आहे. त्याचे धागेदोरे आता थेट त्र्यंबकेश्वरपर्यंत पोचले आहेत. ब्रह्मगिरी पर्वतावर सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना फलक लावून सार्वजनिक शांतता भंग करणे, तसेच आदिवासी समाजात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, या कलमांतर्गत अज्ञात व्यक्तींच्या विरुद्ध त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AC कोचच्या बाथरुममध्ये आढळला पाच वर्षांच्या मुलीचा मृतदेह....मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमध्ये खळबळ

Success story: गुन्हेगारीमुळे बदनाम होतं गाव! आता प्रत्येक घरामध्ये आहेत अधिकारी; नेमका बदल कसा झाला?

Latest Marathi News Updates : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्वच्छ सन्मान सोहळ्याला, उप मुख्यमंत्री अजित पवार उपस्थित

Crime News : जुने नाशिक मधील मसाज पार्लरवर पोलिसांचा छापा; देहविक्री व्यवसाय उघड, ५ महिलांची सुटका

Asia Cup 2025: भारताच्या ७ खेळाडूंचे आशिया चषक संघात पदार्पण; त्यापैकी पाच प्लेइंग इलेव्हनमध्ये नक्की दिसणार

SCROLL FOR NEXT