Corona esakal
नाशिक

Nashik | जिल्‍ह्यात ५५ पॉझिटिव्‍ह, तर ५० कोरोनामुक्‍त

अरूण मलाणी

नाशिक : जिल्‍ह्यात नव्‍याने आढळणाऱ्या दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या पन्नासाहून अधिक राहते आहे. बुधवारी (ता.१७) जिल्‍ह्‍यातील ५५ रुग्‍णांचे कोरोनाविषयक अहवाल पॉझिटिव्‍ह आले. तर पन्नास रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. दोन बाधितांच्‍या मृत्‍यूची नोंद आहे. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत तीनने वाढ झाली आहे. सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्‍यात ४२८ बाधितांवर उपचार सुरु आहेत.



जिल्‍ह्‍यातील कोरोना रुग्‍ण वाढीचा केंद्र आता पुन्‍हा नाशिक महापालिका क्षेत्र झालेले आहे. बुधवारी नाशिक महापालिका क्षेत्रात ३५ रुग्‍णांना कोरोनाची लागण झाली. तर नाशिक ग्रामीणमधील वीस रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. पन्नास रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केल्याची नोंद आहे. दोन बाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला असून, यापैकी प्रत्‍येकी एक नाशिक शहर व ग्रामीणमधील आहे. बऱ्याच दिवसांनंतर नाशिक शहरात कोरोनाचा बळी गेला.

सायंकाळी उशीरापर्यंत ९१७ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी नाशिक ग्रामीणमधील ६८४, मालेगावचे १४०, तर महापालिका क्षेत्रातील ९३ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा कायम होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ९३२ रुग्‍ण दाखल झाले. यापैकी नाशिक महापालिका क्षेत्रातील ९२८ रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हा रुग्‍णालयात दोन रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमधील दोघांचा संशयितांमध्ये समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police: भाडेकरुंमुळे अडचणीत आले पुण्यातले घरमालक! 76 जणांवर गुन्हे दाखल; 'या' चुका पडल्या महागात

Milk Adulteration : दूध भेसळ प्रकरण भरकटविण्याचा डाव; देवदत्त निकम यांच्यावरचे आरोप समर्थकांनी फेटाळले

Latest Marathi News Live Update : पुण्यातील कोथरूड कथित भोंदू बाबा प्रकरणात मुख्य आरोपी दीपक खडकेचा जामीन पुणे न्यायालयाकडून रद्द

LPG New Rule: गॅस ग्राहकांसाठी 16 ऑगस्टची डेडलाईन! eKYC न केल्यास रिफिल आणि सबसिडीवर परिणाम; घरबसल्या eKYC कशी कराल?

Vasai Virar Protest : हक्काच्या जागा, ओळखपत्रांसाठी फेरीवाल्यांचा वसई-विरार महापालिकेवर बेमुदत मोर्चा; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT