gangapur dam esakal
नाशिक

नाशिक जिल्ह्यात ५० टक्के पर्जन्यवृष्टी; तर धरणांमध्ये ५२ टक्के साठा

महेंद्र महाजन

नाशिक : जिल्ह्यात आतापर्यंत ५०.५८ टक्के पर्जन्यवृष्टी झाली असून, सात मोठ्या व १७ मध्यम अशा २४ प्रकल्पांमधील साठा ५२ टक्के झाला आहे. नाशिककरांचे पिण्याचे पाणी अवलंबून असलेल्या गंगापूरमध्ये ७६, तर दारणामध्ये ७५ टक्के साठा झाला आहे. याशिवाय आळंदी, कडवा, हरणबारीमधील साठा ७० टक्क्यांच्या पुढे पोचला आहे.

भावली आणि वालदेवी धरण भरले आहे. नांदूरमध्यमेश्‍वरमध्ये ९८ टक्के साठा ठेवण्यात आला असून, दारणातून एक हजार २९४, भावलीतून १३५, वालदेवीमधून ६५ क्यूसेक विसर्ग सुरू आहे. आळंदीमध्ये ७८, कडवामध्ये ७०, हरणबारीमध्ये ८६ टक्के जलसाठा झाला आहे. याशिवाय इतर धरणांतील जलसाठ्याची टक्केवारी अशी : कश्‍यपी- ५०, गौतमी गोदावरी- ५९, पालखेड- ६१, करंजवण- २५, वाघाड- ५२, ओझरखेड- २६, मुकणे- ५२, भोजापूर- १५, चणकापूर- ४५, केळझर- ५०, गिरणा- ३८, पुनंद- ४७, माणिकपुंज- ५३. गेल्या वर्षी ३ ऑगस्टला जलसाठा ५२ टक्के होता. गेल्या वर्षीपेक्षा यंदा गंगापूर, कश्‍यपी, गौतमी गोदावरी, पालखेड, करंजवण, वाघाड, मुकणे, वालदेवी, कडवा, चणकापूर, हरणबारी, केळझर प्रकल्पांत अधिकचा, तर ओझरखेड, पुणेगाव, तिसगाव, भोजापूर, गिरणा, माणिकपुंज प्रकल्पांत कमी जलसाठा झाला आहे.

आदिवासी पट्ट्यात पावसाच्या सरी

इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्‍वर, सुरगाणा या आदिवासी तालुक्यांत पावसाच्या सरी कोसळत आहेत. नाशिक शहर आणि परिसरात ढगाळ हवामान व पाऊस अधूनमधून सरींच्या स्वरूपात हजेरी लावत आहे. आज सकाळी आठला संपलेल्या चोवीस तासात नाशिक तालुक्यात पाच, इगतपुरीमध्ये २३, दिंडोरीत दोन, पेठमध्ये १९, कळवणमध्ये एक, सुरगाण्यात ८.१, निफाडमध्ये १.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

तालुकानिहाय पावसाची स्थिती (टक्केवारी)

तालुका आतापर्यंतचा पाऊस तालुका आतापर्यंतचा पाऊस

नाशिक २९.४१ कळवण ३३.७७

इगतपुरी ६४.०३ बागलाण ४६.५०

दिंडोरी ३८.२८ सुरगाणा ५७.८१

पेठ ६३.९७ देवळा ४३.७७

त्र्यंबकेश्‍वर ५०.६४ निफाड ५३.०३

मालेगाव ४४.३४ सिन्नर ३३.१२

नांदगाव ३४.६० येवला २५.२७

चांदवड २४.७४ एकूण-गेल्या वर्षी ४८.७४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सटासट...! IND vs WI सामन्यात तरुणीने शेजारी बसलेल्या तरुणाच्या कानाखाली जाळ काढला, Video Viral

Railways Advise: प्रवाशांनो ट्रेनमध्ये 'या' गोष्टी घेऊन गेलात तर खबरदार! दिवाळीसाठी रेल्वेकडून नवी नियमावली जारी; काय लिहिलंय?

Dhananjay Munde: ''तुम्हाला टक्क्यातसुद्धा ठेवणार नाही'' वंजारी आरक्षणाला विरोध, धनंजय मुंडेंचा जरांगेंना इशारा

Japan Flu Outbreak 2025: जपानमध्ये महामारीची शक्यता! ४ हजारहून अधिक रुग्ण; भारतासाठी कितपत आहे धोका?

वेस्ट इंडिजने १२० धावांची आघाडी घेतली, चाहत्यांना १९९७ ची 'ती' मॅच आठवली! सचिन, द्रविड, गांगुलीचा संघ तेव्हा 'वाईट' हरला होता

SCROLL FOR NEXT