Chief Executive Officer of Zilla Parishad Ashima Mittal, District Surgeon Dr. Officers including Charudatta Shinde. esakal
नाशिक

Nashik News: ZP CEO मित्तल यांच्याकडून जिल्हा रुग्णालयाची पाहणी! जनरल, ICU बेड वाढले; तृतीयपंथींकरिता लवकरच स्वतंत्र कक्ष

Nashik News : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी शुक्रवारी (ता. १२) जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट देऊन पाहणी केली

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी शुक्रवारी (ता. १२) जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट देऊन पाहणी केली. या पाहणीमध्ये त्यांनी अतिदक्षता विभाग, बाह्य रुग्ण विभाग त्याचबरोबर बालरुग्ण विभाग यांना भेट देऊन पाहणी केली. त्याचबरोबर रुग्णांची चौकशी करत त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी जिल्हा रुग्णालयातील विविध विभाग व करण्यात आलेल्या बदलांबद्दल माहिती दिली. (Nashik District Hospital inspected by ZP CEO Mittal news)

जिल्हा रुग्णालयात सामान्य रुग्ण विभाग त्याचबरोबर अतिदक्षता विभागातील खाटांची संख्यादेखील वाढविण्यात आली आहे. तृतीयपंथी रुग्णांची अडचण समजून घेत जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात येत आहे. आठवड्याभरात हा कक्ष कार्यान्वित होणार आहे.

या कक्षाची देखील मित्तल यांनी पाहणी केली. त्याचबरोबर रेडिओलॉजी हा स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयातील या बदलांबाबत मित्तल यांनी डॉ. चारुदत्त शिंदे यांचे अभिनंदन केले असून, पुढील काळात माता व बालसंगोपन विभाग देखील त्वरित कार्यान्वित करण्याबाबतच्या सूचना या वेळी केल्या.  (latest marathi news)

२०१५ मध्ये जिल्हा रुग्णालयातील कुंभमेळा इमारत ही कोरोनाकाळात वापरण्यात आली होती. कोविडकाळात या इमारतीचा वापर करण्यात आला, त्यानंतर ही इमारत वापरात नव्हती. जिल्हा रुग्णालयाच्या वतीने जिल्हाधिकारी जलज शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिलेल्या सूचनेनुसार सदर इमारतीचा वापर पुनश्च एकदा सुरू करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शिंदे यांनी या वेळी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bapu Pathare: १०० लोक जमा केले अन्...; बापू पठारेंना मारहाण का झाली? पत्रकार परिषदेत आमदारांनी संपूर्ण विषयच उलगडून सांगितला!

दिवाळीत Invitation Cards बनवायचयं? तर Google Geminiचे 'हे' प्रॉम्प्ट वापरा

World Cup 2025: भारताने जिंकलेला टॉस? पण पाकिस्तानी कर्णधार राहिली चूप; IND vs PAK सामन्यापूर्वीच वादग्रस्त घटना; Video

Solapur Crime:'पैशांवरून पत्नीचा खून; पतीस जन्मठेप'; गॅस टाकीसाठी ठेवलेले पैसे पतीने दारुत उडवले, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा ट्रॅक्टरमधून प्रवास

SCROLL FOR NEXT