collector office nashik esakal
नाशिक

Nashik News : जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्त; लोकसभा निवडणूक

Nashik : लोकसभा निवडणुकीच्या नाशिक व दिंडोरी मतदारसंघांसाठी शुक्रवारपासून (ता.२६) उमेदवारांना अर्ज दाखल करण्याला प्रारंभ होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : लोकसभा निवडणुकीच्या नाशिक व दिंडोरी मतदारसंघांसाठी शुक्रवारपासून (ता.२६) उमेदवारांना अर्ज दाखल करण्याला प्रारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेस कोणतीही बाधा निर्माण होऊ नये, यासाठी परिमंडळ एककडून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. ठिकठिकाणी बॅरिकेडिंग करून सशस्त्र पोलिस बंदोबस्त तैनात असणार आहेत. ( District police security outside collector office )

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी इच्छुकांकडून शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर बॅरिकेडिंग करण्यात येणार आहे.

इच्छुक उमेदवारांच्या अर्ज नोंदणीवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी होण्याची दाट शक्यता आहे. तसेच इच्छुक उमेदवारांचे शक्तिप्रदर्शन, शहरातून निघणाऱ्या रॅली यावरही पोलिसांच्या विशेष पथकांकडून बारकाईने लक्ष राहणार आहे.

स्थानिक पोलिस, गुन्हे शाखांसह राखीव पोलिस दलाच्या तुकड्यांचीही मदत घेण्यात आली आहे. अर्ज नोंदणीदरम्यान, कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीवेळी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून शुक्रवारी (ता. २६) बंदोबस्त तैनात होईल.

वाहतूक मार्गात बदलाची शक्यता

इच्छुक कार्यकर्त्यांसह अर्ज सादर करण्यासाठी येतील, तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम सीबीएस ते मेहेर सिग्नल मार्गावरील वाहतुकीवर होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे दोन्ही प्रवेशद्वारांवर सरकारवाडा पोलिस, गुन्हे शाखा व एसआरपीएफ, होमगार्डचा बंदोबस्त तैनात असेल. जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर चोख बंदोबस्तासह पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक व अंमलदार कार्यरत असतील.

''जिल्हाधिकारी कार्यालय व आवारात, तसेच स्मार्ट रोडवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असेल. यावेळी आवारातील हालचालींवर विशेष शाखा, गोपनीय पथकांचे बारकाईने लक्ष असेल. एसआरपीएफ, सीआयएसएफच्या तुकड्याही तैनात असतील. वाहतूक पोलिस वाहतुकीचे नियोजन करतील.''- किरणकुमार चव्हाण, पोलिस उपायुक्त, परिमंडळ दोन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Political News : नवी मुंबईत भाजपचाच महापौर, कार्यकर्त्यांचा मान राखला जात नसेल तर युती होऊ नये : गणेश नाईक

ICC Women's World Cup : पाकिस्तानच्या पराभवाने टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली! आता एक चूक हरमनप्रीत कौरच्या संघाला पडू शकते महागात

Chh. Sambhajinager Crime: बहुत केस लढ रहा हैं तू; तू खतम, केस खतम, न्यायालयाबाहेर केला ग्राफिक डिझायनरवर जीवघेणा हल्ला

Neena Kulkarni : अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना विष्णुदास भावे पुरस्कार; अभिनय, निर्मिती आणि दिग्दर्शनातील योगदानाबद्दल सन्मान

Latest Marathi News Live Update : बंजारा समाज एसटी आरक्षणासाठी १४ ऑक्टोबरला मोर्चा काढणार

SCROLL FOR NEXT