corona third wave esakal
नाशिक

नाशिक जिल्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी सामना करण्यास सज्ज!

कुणाल संत

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत झालेली मनुष्यहानी पाहता तिसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून आतापासूनच तयारी सुरू झाली आहे. तिसऱ्या लाटेत बालकांना हानी पोहोचू नये, यासाठी विभागाकडून जिल्ह्यातील २० प्राथमिक आरोग्य केंद्रांत २००, तर ३० कोविड केअर सेंटरमध्ये ३०० खाटा राखीव ठेवण्यात येणार.

नाशिक : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Corona second wave) झालेली मनुष्यहानी पाहता तिसऱ्या लाटेची (Third wave) शक्यता गृहित धरून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून आतापासूनच तयारी सुरू झाली आहे. तिसऱ्या लाटेत बालकांना हानी पोहोचू नये, यासाठी विभागाकडून जिल्ह्यातील २० प्राथमिक आरोग्य केंद्रांत २००, तर ३० कोविड केअर सेंटरमध्ये (Covid care centre) ३०० खाटा राखीव ठेवण्यात येणार आहेत.

(Nashik district ready to face the third wave of corona)

आरोग्य विभागाकडून आवश्‍यक ती संपूर्ण तयारी...

कोरोना महामारीच्या (Covid pandemic) दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील नागरिकांना जीव गमवावा लागला होता. कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता अनेकांना ऑक्सिजनसाठी (Oxygen) वणवण फिरावे लागले. अनेकांना रुग्णालयात बेडही उपलब्ध झाले नाहीत. अनेक रुग्णांचा वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्याने जीव गेला. यानंतर आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. तिसरी लाट आल्यास त्याचा प्रभावीपणे सामना करता यावा आणि रुग्णांची सुविधांअभावी गैरसोय होऊ नये, म्हणून आरोग्य विभागाकडून आतापासून आवश्‍यक ती संपूर्ण तयारी केली जात आहे.

तिसऱ्या लाटेत बालकांना लागण होण्याची शक्यता...

आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील लहवित, सय्यदप्रिंपी, जातेगाव, सोमठाणे, देवपूर, निमगाव, चांदोरी, खडकमाळेगाव, करंजाळी, बुबळी, नांदुरी, वडनेरभैरव, काजीसांगवी, अंजनेरी, न्यायडोंगरी, भारम, तळेगाव दिंडोरी, दहिवड, ताहराबाद आणि कोरपगाव या २० आरोग्य केंद्रांमध्ये प्रत्येकी ३० बेड ऑक्सिजन सुविधेसह तयार करण्यात येणार आहेत. तिसऱ्या लाटेत बालकांना कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण होण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने प्रत्येकी दहा बेड राखीव ठेवले जाणार आहेत.

तिसऱ्या लाटेत औषधांचा पुरेसा साठा जिल्ह्यातील आरोग्य विभागाकडे असावा, या दृष्टीने आरोग्य विभागाकडून कोट्यवधींची औषध खरेदी केली जाणार आहे. त्यास सर्व सदस्यांनी मंजुरी दिली आहे.

(Nashik district ready to face the third wave of corona)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT