Commissioner Praveen Gedam esakal
नाशिक

Divisional Commissioner Praveen Gedam : विभागीय आयुक्तांकडून सोमवारी कुंभमेळ्याचा आढावा

Nashik News : मागील सिंहस्थाचा अनुभव असलेले विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी आत्तापासूनच कुंभमेळ्याची तयारी सुरु केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मागील सिंहस्थाचा अनुभव असलेले विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी आत्तापासूनच कुंभमेळ्याची तयारी सुरु केली आहे. यासंदर्भात त्यांनी सोमवारी (ता. ८) दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलविली आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. (Divisional Commissioner Dr. Praveen Gedam)

यंदाच्या कुंभात देश-विदेशातून पाच कोटी भाविक हजेरी लावतील, असा अंदाज आहे. त्याअनुषंगाने प्रशासनाने सिंहस्थाचे नियोजनावर भर दिला आहे. परंतु, मध्यंतरीच्या काळात लोकसभा व त्यानंतर विधान परिषद शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे कामकाज काहीसे थंडावले होते.

मात्र, निवडणूक पार पडताच प्रशासन पुन्हा एकदा कुंभमेळ्याच्या तयारीला लागल्याचे चित्र आहे. विभागीय आयुक्त गेडाम यांनी कुंभाच्या तयारीत लक्ष घातले आहे. सिंहस्थाच्या नियोजनाशी निगडित यंत्रणांची बैठक बोलविली आहे. नाशिक शहरात कुंभाच्या दृष्टीने करावयाच्या विकास कामांसाठी महापालिकेने ११ हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. (latest marathi news)

आराखड्यात रिंगरोड, नवीन रस्ते, प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती, वाहनतळ, तात्पुरते निवारागृहे, साधुग्राम आदी कामांचा समावेश आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, एसटी महामंडळ, महावितरण अशा विविध यंत्रणाही त्यांच्या स्तरावर आराखडे तयार करत आहेत.

सर्व यंत्रणा मिळून सुमारे ३ ते साडेतीन हजार कोटी रुपयांची मागणी केली जाऊ शकते. त्याअनुषंगाने आयुक्त गेडाम यांनी बोलाविलेल्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. बैठकीत गेडाम तयारीसंदर्भात काय निर्देश देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

भेटीसाठी आता अपॉइंटमेंट घ्यावी लागते, स्वतःची ओळख सांगावी लागते... अजित पवारांच्या आठवणीत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची खंत

Pune Bengaluru Highway : कराड उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात! कोल्हापूर-पुणे मार्गावर उद्यापासून वाहनांची चाचणी; कधी होणार पूर्ण खुला?

Ketan Agarwal Killed Case : गुगलवर शोधले खून करण्याचे पर्याय;गडावरून ढकलण्याचा केला होता सराव

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

SCROLL FOR NEXT